पुणे : विदेशी तरुणीवर बलात्कार प्रकरणात एका वकिलासह सहा जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी (दि.८) दिले.
ऋषीकेश नवले (वय ४८), प्रतीक शिंदे (वय ३६), अॅड. विपीन बिडकर (वय ४८), सागर रासगे (वय ३५), अविनाश सूर्यवंशी (वय ५८), मुद्दसर मेमन (वय ३८) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असताना परदेशातून नोकरीच्या शोधात आलेल्या एका तरुणीवर आरोपींनी बलात्कार केल्याची माहिती मिळाली.