Supriya Sule : देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी संभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असून ते गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहेत. त्यांना पारदर्शकपणे काम करु दिले जात नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवं विधेयक मांडल आहे. ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आली आहेत. गृहमंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबीयांनी मोठं योगदान दिलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज आहे. नव्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन करावे. इंडिया आघाडीतही त्यांचा मोठा रोल असणार आहे, असा मला विश्वास आहे. संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
संविधानाच्या रक्षणासाठी आणि देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र : सुप्रिया सुळे
संविधानाच्या रक्षणासाठी आणि देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तसेच प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आहे. त्यावेळीच जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत निर्णय झाला आहे. आता केवळ शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. सात-आठ दिवसात याबाबतची माहिती दिली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.