यवत (पुणे) : श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथी सर्वत्र साजरी केली जाते. यवत येथील रायकरमळा येथे देखील विविध धार्मिक कार्यक्रमाने श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
मिती आषाढ कृ. 14 शनिवार (दि. 03 ऑगस्ट) पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक व सत्यनारायण महापुजा, समाधी सोहळा पुष्पवृष्टी, दुपारी सार्वजनिक भजन, सायंकाळी श्री विठ्ठल अध्ययनिक वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने हरिपाठ आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी ह.भ.प. रामायणचार्य ज्ञानेश्वर महाराज रासकर (रामलिंग देवस्थान शिरूर) यांचे सुश्राव्य असे हरि किर्तन संपन्न झाले. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी यवत परिसरातील व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज मित्र मंडळ, यवत,(रायकरमळा/कुदळेमळा) व यवत येथील समस्त भजनी मंडळ व भाविकांच्या सहकार्याने पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला.