पुणे : लॉजमध्ये का गेली होतीस? असे विचारल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने आपल्याच वडिलांना मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ही घटना चर्होलीतील त्यांच्या राहत्या घरी सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली आहे. याप्रकरणी पतीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आबा राजाभाऊ गिरी (वय 48, रा. चर्होली खुर्द, ता. खेड) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी व मुलगा श्रीकृष्ण आबा गिरी (वय – 25) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबा गिरी हे घरी असताना त्यांची पत्नी व मुलगा घरी आले. तेव्हा फिर्यादीने पत्नीला विचारले की तू पार्वती लॉजमध्ये का गेली होतीस. त्यावर तिने तू मला कोण विचारणार, असे म्हणून आबा गिरी यांना शिवीगाळ करुन खलबत्याचे मुसळीने डोक्यात उजव्या बाजूस मारुन जखमी केले.
दरम्यान, मारहाण झाल्यानंतर गिरी मोठ्याने ओरडले यावेळी मुलगा श्रीकृष्ण याने कांदा कापण्याच्या सुरीने आपल्या वडिलांच्या हाताच्या मनगटावर वार करुन जखमी केले. सहायक पोलीस फौजदार यादव तपास करीत आहेत.