राहुलकुमार अवचट
यवत : जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा होत असतानाच दोन महिलांनी आत्महत्या केल्याने दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यमुना हनुमंत कारंडे(रा. पारगाव, ता.दौंड, जि. पुणे) व पूनम बाळासो टेकवडे ( वय २२ वर्ष, रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे) मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना कारंडे यांचा मृतदेह पारगाव येथील शेतकरी सयाजी ताकवणे यांच्या शेतातील विहिरीमध्ये आढळून आला. यासंदर्भात त्यांचे पती हनुमंत कारंडे यांनी यवत पोलिसांना खबर दिली आहे. तर पोलिसांना यमुना कारंडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.
दरम्यान, यमुना या रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय पाटस व जय मल्हार विद्यालय देलवडी येथे क्लार्क पदावरती लिपिक म्हणून कार्यरत होत्या. तर पती हनुमंत कारंडे हे जिल्हा बँकेच्या राहू शाखेमध्ये रोखपाल म्हणून कार्यरत आहेत. यमुना ह्या आपल्या मनमिळावू स्वभावासाठी परिसरात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पाठीमागे वीस वर्षीय इंजिनियर मुलगी व अठरा वर्षीय बारावी शिकत असलेला मुलगा असा परिवार आहे.
तर दुसरी घटना दुपारी कासुर्डी गावच्या हद्दीत घडली असून पूनम बाळासो टेकवडे ( वय २२ वर्ष, रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे) हिने राहते घरात पत्र्याचे लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत लक्ष्मण बजाबा खेनट यांनी यवत पोलिसांना माहिती दिली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.