पुणे : पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढट असल्याचे समोर आले असताना, हडपसर परिसरातील नोबल हॉस्पिटलने मात्र या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाची माहिती महापालिकेला कळविली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला अआहे.
पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढत आहे. अशातच हडपसर परिसरातील नोबल हॉस्पिटलने या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाची माहितीच महापालिकेला कळविली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आणखी गंभीर बाब म्हणजे, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने यावर कोणतीही कठोर कारवाई न करता फक्त नोबल हॉस्पिटलला एक नोटीस पाठविली आहे.
पुण्यातील एरंडवणा परिसरामध्ये झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर शहरात तिसरा रुग्णही सापडला. मात्र, झिकाची लागण झालेल्या रुग्णाची माहितीच नोबल हॉस्पिटलने महापालिकेला कळविली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने नोबल रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे.
नोबल हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर ३१ मे रोजीच या प्रकरणाची माहिती देणे आवश्यक असताना, मात्र नोबल हॉस्पिटलने महापालिकेला कळविले नाही. मात्र, नोबल हॉस्पिटलने महापालिकेला कळविले नाही. त्यांच्या निष्काळजी वर्तनाबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागाने हॉस्पिटलला पत्र पाठवले आहे.
‘‘भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती करू नये,’’ असे आम्ही नोबल हाॅस्पिटलला बजावले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी सांगितले आहे. मुंढवा येथील ४७ वर्षीय महिलेला ३१ मे रोजी ताप, डोकेदुखी आणि डेंग्यूसदृश लक्षणांच्या तक्रारींसह नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संसर्गजन्य रोगतज्ज्ञ म्हणून, उपचार करणारे नोबल हाॅस्पिटलचे डॉ. अमित द्रविड यांनी या रुग्णाला डेंगी, चिकुनगुनिया आणि झिका यासाठी चाचण्या करण्याचे सुचविले. यावेळी संबंधित रुग्णाची झिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली.
डॉ. अमित द्रविड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘झिकाचा विषाणू शहरात फिरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या, असे आम्ही सुचविले होते. रुग्णाला डेंगीसारखी लक्षणे दिसून आली. संबंधित महिलेची चाचणी १ जून रोजी पॉझिटिव्ह आली. तिच्यावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. आता ती पूर्णपणे बरी आहे. झिका आणि डेंगी हे दोन्ही एकाच प्रकारच्या म्हणजे एडिस इजिप्ती डासाद्वारे प्रसारित होत असल्याने आम्ही नागरिकांना आवाहन करतो की, अगदी डेंगी किंवा साधा ताप आणि अंगदुखीसारखी लक्षणे दिसली तरीही झिका आणि चिकुनगुनियाचीही चाचणी करून घ्यावी.’’
गर्भवती महिलांनाच झिकाचा धोका जास्त असला तरी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, असे आवाहनदेखील डॉ. द्रविड यांनी केले.
झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत?
- झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे ३ ते १४ दिवसांमध्ये दिसून येतात.
- झिका व्हायरसची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये प्रारंभी लक्षणे दिसून येत नाहीत.
- एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो.
- ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायुदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळतात.
मुंढवा येथील प्रकरणानंतर महापालिकेने सर्वेक्षण केले. त्यामध्ये सुमारे १३ संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. आम्ही चाचणीसाठी त्यांचे नमुने गोळा केले आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) ते चाचणीसाठी पाठविले आहेत. त्यांच्याकडून चाचणी अहवालाची प्रतीक्षा करत आहोत.
-डॉ. कल्पना बळिवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका