Shivshahi Bus Caught Fire : अहमदनगर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. बसमध्ये 45 प्रवाशी प्रवास करत असताना अचानक हा प्रकार घडल्यामुळे सर्व प्रवाशी घाबरून गेले मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस कडले घेत सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे. ही घटना घारगाव येथील मुळा नदीच्या कडेला घडली आहे. (‘Shivshahi’ suddenly caught fire on the Pune-Nashik national highway)
कॉम्प्रेसरने घेतला पेट
या घटनेबाबात अधिक माहिती अशी की, 45 प्रवाशी असलेली ही शिवशाही बस एमएच ०६, बीडब्ल्यू ०६४९ शनिवार 20 मे रोजी पिंपरी-चिंचवड आगारातून निघाली. (Shivshahi Bus Caught Fire) आकाश अरविंद गायकवाड या बसचे चालक होते. दरम्यान नाशिककडे जात असताना दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव परिसरात आल्यावर बसच्या एसी कॉम्प्रेसरमधून अचानक धूर निघाला. हा धूर बघून बसमधील प्रवासी घाबरून गेले. त्याच क्षणी चालक गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या कडेला घेतली. (Shivshahi Bus Caught Fire) बस कडेला घेताच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान चालक गायकवाड यांनी दुसरी बस थांबवून प्रवाशांना बसवून दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loniknad Accident News : अष्टविनायकला निघालेल्या खासगी बसचा लोणीकंद परिसरात अपघात ; ५ प्रवासी जखमी