शिरूर : शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत आघाडी धर्म न पाळता पक्ष विरोधात काम केल्यामुळे शिवसेनेच्या (उबाठा) शिरुरमधील पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख पोपट शेलार यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा) महत्वाची भूमिका बजावत आहे. परंतु, तालुक्यातील पक्षाचे माजी शहरप्रमुख तथा तालुका सल्लागार सुनिल जाधव, विभाग प्रमुख भिमराव कुदळे, युवा सेना तालुका अधिकारी विजय लोखंडे, युवासेना शिरूर शहराधिकारी स्वप्निल रेड्डी यांनी आघाडी धर्म न पाळता पक्ष विरोधी काम केले आहे. त्यामुळे तालुका पक्ष प्रमुख पोपट शेलार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.