यवत: दुष्काळी परीस्थिती असल्याने दौंड तालुक्यातील तलाव व फाटे यांना तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंके यांनी कार्यकारी अभियंता खडकवासला उपविभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दौंड तालुक्यातील पाटस परीसरातील गावाच्या जवळ असलेला तलाव अनेक दिवसांपासुन कोरडा पडलेला असल्याने परीसरातील विहीरी व बोअरवेल्स कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाचा व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. २६,२७, २८ या फाट्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची पिके जळुन चालली आहेत.
या फाट्याच्या परिसरातील जनावरांकरीता असलेला चाराही पाण्याअभावी जळत असल्याने पाटस तलाव व २६,२७,२८ या फाट्यांना तातडीने पाणी सोडावे. अन्यथा नऊ एप्रिल रोजी सर्व शेतकरी व नागरिक या फाटा व तलावासाठी मुख्य कॅनॉलवर असलेल्या चिमण्या (दरवाजे) फोडून पाणी सोडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दौंड तालुका अध्यक्ष संजय शिंदे व शिवसंग्राम संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते