लोणी काळभोर, (पुणे) : येथील प्रहार विद्यार्थी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवराज मनोज काळभोर याला नुकताच अंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत समिती नवी दिल्ली यांच्या वतीने कार्यक्षम विद्यार्थी युवा नेतृत्व हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शनिवारी (ता. २९) पुण्यातील नामांकित ग्रैण्ड शेरेटॅान येथे या पुरस्कारांचे वाटप अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिवराज काळभोर याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी समाजसेवेत उडी घेत ३ वर्षात त्याने विद्यार्थी व युवकांसाठी अनेक कामे केली आहेत. अनेक शाळेवर आंदोलन करत विद्यार्थी व युवकांना न्याय मिळवुन दिला आहे.
दरम्यान, अत्यंत कमी वयात खुप मोठे कार्य केले आहे. व करत आहे हे सर्व लक्षात घेत महाराष्ट्रातुन कार्यक्षम विद्यार्थी युवा नेतृत्व महाराष्ट्र रत्न या पुरस्कारासाठी शिवराज ची निवड करण्यात आली आहे.