युनुस तांबोळी
शिरूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिती, राजनिती, आचरणनिती यासारख्या अनेक गोष्टी शिकवल्या. शिवजयंती उत्सव
साजरा करताना महाराजांचा एखादा तरी गूण विद्यार्थ्यांनी अंगिकारावा. असे आवाहन शिव व्याख्याते शेखर पाटिल यांनी केले.
कवठे येमाई (ता. शिरूर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॅालेज मध्ये राजमाता महिला ग्रुप च्या वतीने शिवजयंती आज शनिवार (ता.२५) साजरी करण्यात आली. त्यावेळी वरील आवाहन पाटील यांनी केले आहे.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, मिटू शेठ बाफना,राजमाता महिला ग्रुप च्या अध्यक्षा वैशाली रत्नपारखी,साधना पोकळे, सविता इचके, अलका कुंभार, रूपाली सांडभोर, रेखा कांदळकर, साधना सांगळे,मीरा गायकवाड, रूपाली नवनाथ सांडभोर, अश्वीनी धर्माधिकारी, प्रमिला गायकवाड, संगिता रोहिले, शारदा रासकर, कमल दहितुले, नवनाथ सांडभोर, रामदास इचके, दिपक रत्नपारखी आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, शाळांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा गड व किल्ल्याबरोबर इतीहास देखील वाचला गेला पाहिजे. या पुढील काळात राजमाता महिला ग्रुप च्या वतीने मातृभाषा दिन व आरोग्याच्या सुवीधांसाठी उपक्रम राबविले जाणार आहे. असे वैशाल रत्नपारखी यांनी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेने सहभाग दाखवला होता.