Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 25 February 2025, 17:14

लोणी काळभोर, (पुणे) : मांजरी (ता. येथील) पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला अभिवादन केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या पाळण्याचा नृत्याविष्कार सादर केला. त्यानंतर इयत्ता दुसरीच्या श्रेया मोरे व इयत्ता पहीलीची देवांशी शेटे यांनी भाषण करून शिवरायांचे पराक्रम व त्यांच्या विचारांची महत्ता पटवून दिली.

कार्यक्रमात इयत्ता पहिलीचा विद्यार्थी अधव अनिश याने एकल अभिनय सादर केला. या अभिनयात त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्या व्यक्तिरेखा साकारत उपस्थितांची मने जिंकली. या प्रयोगातून शिवरायांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न आणि तानाजी मालुसरे यांचे बलिदान यांचा प्रभावी संदेश दिला. यानंतर विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या बालपण आणि आजच्या पिढीच्या बालपणातील फरक दर्शविणारा नाट्यप्रयोग सादर केला. या नाटकातून मुलांना शिवरायांच्या शिस्तबद्ध आणि ध्येयवादी जीवनशैलीचे महत्व पटवून देण्यात आले.

दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनल वैद्य, शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे कौतुक केले. कार्यक्रमाचा शेवट महाराष्ट्र राज्यगीत आणि राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या योगदानाने यशस्वी झाला व प्रत्येकाच्या मनात शिवरायांप्रती आदरभाव निर्माण झाला.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात टँकर ठरतोय ‘यमदूत’! वानवडीत महिलेचा भीषण अपघातात मृत्यू, 48 तासांत दोन बळी गेल्याने शहरात खळबळ

Tuesday, 7 April 2026, 13:02

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52
Next Post
MLA Jayant Patil Meets Minister Chandrashekhar Bawankule

महाराष्ट्रात आणखी एक भूकंप? जयंत पाटील मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर, तासभर चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.