युनूस तांबोळी
Shirur | शिरूर : उन्हाळा सुरू झाला की चैत्रात वेगवेगळ्या फळांना बहर येतो. या काळात मुलांना फळांचा आस्वाद मिळावा. त्यातून त्यांची आरोग्यशक्ती वाढावी. त्यांनाही शेतीचे महत्व पटवून देऊन झाडांमुळे मिळणारी स्वच्छ हवा आणि खेळायला मिळणारी सावली. याचा अनुभव यावा. जेष्ठांनी वृक्षांना किती महत्व दिले हे पटवता यावा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
'आनंदाचे डोही आनंद तरंग'
शिरूर तालुक्यातील थोरातवस्ती जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांना परसबागेतील फळांचा घेतला आस्वाद…! pic.twitter.com/vj6IMhm7x7— Pune Prime News (@puneprime_news) April 15, 2023
यासाठी मलठण ( ता. शिरूर ) येथील थोरातवस्ती जिल्हा परिषद शाळेने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा उपक्रम राबविला असून परसबागेतील आंब्याला आलेल्या आंबा विद्यार्थ्यासाठी राखून ठेवला आहे. विद्यार्थी देखील येथील वेगवेगळ्या फळांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
मलठण ( ता. शिरूर ) येथील थोरातवस्ती जिल्हा परिषद ही प्राथमिक शाळा व्दि शिक्षकी शाळा आहे. येथील मुख्याध्यापक युवराज थोरात व शिक्षिका सरीता दंडवते यांनी येथील माळरानावर वेगवेगळ्या वृक्षाची लागवड केली आहे.
ग्रामस्थांकडून पाण्याचे व्यवस्थापन करून झाडांचे संगोपन…
ग्रामस्थांकडून पाण्याचे व्यवस्थापन करून झाडांचे संगोपन करण्यात आले आहे. त्यांनी या परिसरात दोन रत्नागिरी हापूस आंब्याची लागवड केली होती. त्या आंब्याना या उन्हाळ्यात आंबे लगडले आहेत. आंब्याच्या या जातीच्या लावलेल्या झाडांना विद्यार्थ्यीनी पाणि देऊन संगोपन केले आहे. डोळ्या देखत लावलेल्या या आंब्याना फळे आल्याने मुलांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. सध्या कडक उन्हाळ्या सुरू झाला आहे. मुले शाळेत येण्यास कंटाळा करतात. मात्र येथील झाडांच्या सावलीत मुलांना खेळायला आवडत असल्याने या काळात देखील विद्यार्थी शाळेत हजर राहण्याचे प्रमाण अधिक आहे.
या काळात कैऱ्यांचा स्वाद मुले घेत असल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले. पेरू चे देखील वेगळ्या जातीचे झाड लावलेले होते. त्यालाही मोठ्या प्रमाणात पेरू लगडले आहेत. मुले त्याचाही स्वाद घेत आहेत. पाण्याचे व्यवस्थापन झाले की हवामानानुसार या ठिकाणी परसबाग केली जाते. त्यातून वेगवेगळी पिके विद्यार्थी घेतात. त्याचा आहारासाठी वापर केला जातो. हा उपक्रम वर्षभर राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या लहानपणी झाडांवरच्या गंमतीजमती मुलांनी केल्या पाहिजे. त्या बरोबर मिळणाऱ्या स्वच्छ हवेत खेळावे यासाठी या ठिकाणी वृक्षाची लागवड केली आहे. मुले देखील त्याचा आस्वाद घेतात. भविष्यात अजूनही वेगवेगळ्या फळांची झाडे लागवड करणार आहोत. त्यातून मुलांना शाळेची गोडी व शिक्षणातला अनुभव तयार व्हावा असा उद्देश आहे.
युवराज थोरात
मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरातवस्ती
वृक्षांची लागवड केल्याने या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येऊ लागले आहेत. झाडांची सावली झाल्याने मुलांना खेळण्यासाठी आनंद वाटतो. येथे येणाऱ्या फळांचा आस्वाद त्यांनी घ्यावा असाच हेतू ठेवून फळांची झाडे लावली आहे. शेतीचे महत्व कळावे यासाठी पावसाळ्यात परसबाग देखील केली जाते.
सरीता दंडवते
शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरातवस्ती
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur News : कवठे येमाई येथील बाजीराव उघडे ;समाज रत्न&; पुरस्काराने सन्मानित..!