Shirur News : शिरूर : पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यावर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून धरणक्षेत्रात पाणीसाठा तयार झाला असला, तरी पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून मीना शाखा कालव्यावरील अडचणी सोडवाव्यात, अपव्यय होणाऱ्या पाण्याची बचत करावी, असे आवाहन मीना शाखा कालवा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी केले.
मीना कालवा पाणी वापर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पारगाव (ता. जुन्नर) येथे मीना शाखा कालव्यावरील सर्व २८ पाणी वापर संस्थाच्या २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा वायसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (Shirur News ) त्यावेळी ते बोलत होते. संस्था सक्षमीकरणासाठी आवश्यक बाबी, रब्बी हंगामातील पाण्याचे नियोजन करणे, पाणी वापर संस्थांनी सीसीएच्या प्रमाणात मागणी क्षेत्र देणे, सक्षम सचिवांची नेमणूक करणे, वितरिका स्तरीय संस्था तयार करणे, संस्थानचे ऑडिट, अनुदान आदी विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.
या वेळी संपत पानमंद, ज्ञानेश्वर उंडे, बाळासाहेब पठारे, रखमा निचित, शंकर पिंगळे, राहुल डुकरे, प्रकाश भाकरे, रोहिदास मुसळे आदींनी मनोगतात संस्थांना येणाऱ्या अडचणीं मांडल्या. (Shirur News ) प्रास्ताविक सुभाष झिंजाड यांनी केले. पांडुरंग डुकरे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरुर तालुक्यातील जांबूत येथील श्रीराम गोरडे यांची कर सहाय्यक पदी निवड..