युनूस तांबोळी
शिरूर: Shirur News – शिरूर तालुक्यात ‘ईद- उल- फित्र’ म्हणजेच रमजान ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण होणार आहे. प्रत्येक गावात आणि शिरूर शहरात मुस्लीम बाधंव देशात शांतता व सुखसमुद्धी लाभावी यासाठी प्रार्थना करतील. (Shirur News) यासाठी शहर पोलिसांनी ईदगाह मैदानाची पहाणी करून आढावा घेऊन बंदोबस्त ठेवला आहे. (Shirur News) दरम्यान अक्षय तृतीया चा आमरस पुरी व रमजान निमित्त शिरखुर्मा यामध्ये हिंदू मुस्लिम बांदवाचे ऐक्य पहावयास मिळणार आहे. (Shirur News)
शिरूर तालुक्यात गावागावात ईदगाह मैदान सकाळपासून फुलून जाणार
शिरूर तालुक्यात रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान मुस्लीम बांधवानी फुलून जाणार आहे. त्यासाठी शिरूर तालुक्यातील पोलिस दलाने बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांनी दिली. गाव तिथे पोलिस यासाठी तैनात केला आहे. शिरूर तालुक्याच्या बेट भागात टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई, पिंपरखेड, कान्हूर मेसाई या परिसरात मैदानावर गर्दी पहावयास मिळणार आहे.
या सणानिमित्त बाजारपेठ गर्दीने खुलून गेली होती. संपुर्ण बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी मुस्लिम बांधवाची गर्दी पहावयास मिळाली. महिला व चिमुकल्यांच्या कपड्यांसाठी अधिक मागणी दिसून आली. त्यानिमित्त दुकानदारांनी सुद्धा विविध डिझाईन, पॅटर्न चे आकर्षक कपडे दुकानात ठेवले होते. पंजाबी ड्रेस, लेगीज, टॅाप यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. प्रत्येक्ष खरेदीसह सोशल मिडीयावर देखील खरेदीस चांगला प्रतीसाद होता.
दरम्यान, अक्षय तृतीया निमित्त आंबा खरेदीला नागरिकांनी अधिक प्राधान्य दिले होते. या निमित्त गावागावात ग्रामदैवतांच्या यात्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बैलगाडा शर्यत, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजीत केले आहेत. या दोन्ही सणांचे महत्व पहाता हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्य पहावयास मिळणार आहे. शुभेच्छांच्या वर्षावाने संपुर्ण दिवस गजबजणारा दिसणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur | शिरूर तालुक्यातील पती-पत्नीनंतर आता भाऊ-बहिण एकाचवेळी झाले पोलीस दलात भरती…!