Shirur News : पुणे : शिरूर तालुक्यात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून प्रेत जाळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा व शिकापूर पोलिसांनी करत पाच दिवसांमध्ये आरोपींना गजाआड केले. (In Shirur taluka, accused of burning corpses with intent to destroy evidence were chained by police; The plot was hatched after watching a crime web series)
अॅग्नेल जॉय कसबे (वय २३ वर्षे, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३ वर्षे, रा. रा. ए १६, तिसरा मजला गुडविल वृंदावन आनंदपार्क वडगाव शेरी पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. तसेच एका आल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.(Shirur News) जॉन्सन कॅजीटन लोबो (वय ४९ वर्षे, रा. ए १६, तिसरा मजला गुडविल वृंदावन आनंद पार्क वडगाव शेरी पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी शिकापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाच दिवसांमध्ये आरोपी गजाआड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेबसिरिज पाहून खून करण्याची आयडिया आल्याचे आरोपींनी पोलिस तपासात सांगितले. १ जून रोजी सकाळी ०७.३० वाजता सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे पुणे-अहमदनगर हायवे रोड लगत गवारे यांचे एच.पी. पेट्रोल पंपाजवळ जितेंद्र बाबू ललवाणी यांचे प्लॉटींग लगत अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून एका अनोळखी पुरूष जातीच्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने प्रेत पेट्रोल टाकून जाळून टाकले होते. (Shirur News) यामध्ये यातील मृतदेह हा पुर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते.
त्यामुळे पोलिसांना तपास लावण्याचे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात होते. तपासा दरम्यान शिकापूर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी (Shirur News) सुमारे २३० सीसीटीव्ही कॅमेरे शिक्रापूर ते चंदननगर वडगाव शेरी पुणे असे सलग चार दिवस रात्र पाहून गुन्हयात वॅगनआर कारचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
वाहन हे वडगाव शेरी परीसरातील असून सदरची गाडी जॉय कसबे (रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे) हा वापरत असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता, वॅगनआर कार ( एम.एच. १२ सी.के. ३१७७)त्याचा मुलगा अॅग्नेल जॉय कसबे हा घेवून गेला असल्याचे सांगितले.
आरोपी अँग्नेल कसबे याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ही मुलगी आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत यांची मुलगी आहे. त्यांच्या या प्रेमसंबंधाला (Shirur News) आरोपी सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती, परंतु मयत यांचा विरोध होता. त्यामुळे आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत जॉन्सन लोबो यांचेत वाद होत होते. मयतास कायमचा दूर करणेच्या उद्देशाने वेगवेळया क्राईम वेब सिरीज पाहून कट रचला.
आरोपींनी संगणमत करून मयत जॉन्सन कॅजीटन लोबो याचा ३० मे रोजी रात्रीचे वेळी त्याच्या घरातच डोक्यात वरवंटयाने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला. (Shirur News) त्यानंतर मयत प्रेत घरातच ठेवले आणि मयताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मयतास वॅगनआर कारमध्ये टाकून सणसवाडी जवळील एचपी पेट्रोल पंपाचे अलीकडे पुणे ते अहमदनगर हायवे रोडलगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतचे नाल्यात टाकून त्याचेवर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिल्याचे सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : कौतुकास्पद! वादन कला अवगत असलेला तरुण मुंबई लोहमार्ग पोलिस दलात भरती