Shirur News : जांबूत : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पिकांसोबतच काही व्यापारक्षम पिकांची लागवड करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात पतसंस्थेच्या माध्यमातून पिकांसाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची जबाबदारी सर्व संचालक मंडळांनी घेतली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे काम होऊ शकेल, असे मत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले.
जांबूत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार
जांबूत (ता. शिरूर) येथे जांबूत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण कड, साई कृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप, सरपंच दत्तात्रेय जोरी, उपाध्यक्ष बाळासाहेब बदर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, संचालक बाळासाहेब फिरोदिया, माजी मुख्याध्यापक आर. एस. कापसे, बाळासाहेब पठारे, वासुदेव जोरी, अशोक मंदीलकर, पोपट सापते, बिपीन थिटे, वसंत राळे, कैलास कांदळकर,(Shirur News ) पोपट माळी, अलका गाजरे, संस्थेचे बँक व्यवस्थापकर योगेश पावडे, नाथा जोरी, दक्षणा थोरात, सुनिता कड, सोमनाथ पळसकर, उपसरपंच राणीताई बोऱ्हाडे, पोपट फिरोदिया, सुभाष जगताप, सुप्रिया जगताप, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिक जगताप, आनंद शिंदे, अशोक चव्हाण, लहू गाजरे व संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.
जांबूत पतसंस्थेचे या आर्थिक वर्षात भाग भांडवल ११३ लाख, ठेवी १३ कोटी २६ लाख, कर्ज वाटप ९ कोटी २४ लाख, नफा ३३.२९ लाख, कर्ज वसुली ९८.३० टक्के आहे. पतसंस्थेच्या वतीने उल्लेखनीय काम केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला. (Shirur News ) सभासदांनी संस्थेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे आवाहन केले. सभेला शेवटपर्यंत उपस्थित राहणाऱ्या उपस्थितांपैकी १० भाग्यवान व्यक्तींना लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येकी ५०० रूपये रोख रक्कम भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू गाजरे यांनी केले. तर आभार संस्थेचे संचालक बाळासाहेब फिरोदिया यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा
Shirur News : दारू पिणाऱ्या १७५ वाहन चालकांना दंड ; कारवाई आणखी तीव्र होणार