युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर ः मेघ गर्जती सरी बरसती…असा जलधारांचा पाऊस निसर्गातल सौंदर्य अधिकच खुलवून काढतो. पण जागतीक तापमान वाढीचा परिणाम पाऊसावर देखील झालेला पहावयास मिळतो. त्यामुळेच निसर्गाच्या लहरीपणामुळे ऋतुचक्र उलटे फिरू लागल्याचे दिसून येते. मृग नक्षत्र सुरू होऊन देखील मृगधारा बरसण्यास तयार नाहीत. पाऊसाच्या आगमनावर बळीराजाचे स्वप्न अवलंबून असते. तू असा बरस की आसुसलेल्या जीवांना हिरव लेण पांघरायला मिळाव. वर्षा ऋतूचा चिंभ भिजून काढणारा सोहळा व्हावा. अशी आशा शेतकरी वरूणराजाकडे करू लागल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे.
शिरूर तालुक्यात मृग नक्षत्रातील पाऊसावर खरीप हंगामातील पिकांची गोडी निर्माण होते. गेले अनेक वर्षापासून कमी अधिक प्रमाणात पाऊसाच्या हजेरी दिसून येत आहे. चासकमान व डिंभा धरणाच्या पाण्यावर तसेच कुकडी प्रकल्पामुळे या भागात बागायती क्षेत्रात वाढ झालेली आहे. (Shirur News) काही भागात जलसंधारणाची कामे झाल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झालेली पहावयास मिळते. आंबेगाव- शिरूर या परिसरात माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील तर शिरूर हवेली या परिसरात आमदार अशोक पवार यांनी अनेक योजनेच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. ऋतूचक्र बदलल्याने केव्हाही पडणारा पाऊस यातून शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांनी पुर्व पावसाळी कामे आटोपून खरीपाची तयारी केली आहे. रोहिणी नक्षत्र कोरडे गेले आता मृग नक्षत्र सुरू होवून आठवडा उलटला तरी पावसाने हजेरी लावली नाही. मेघ येतात आणि निघून जातात. पावसाळी वातावरण होऊन देखील पावसाची हजेरी ही शेतकऱ्यांला आभाळाकडे डोळे लावणारी ठरू लागली आहे.
सात जूनला येणारा वरूणराजा १४ जून आले तरी बरसत नसल्याने पाऊसा अरे पाऊसा..रूसलास का असेच म्हणण्याची वेळ आली आहे. अवेळी बरसून नुकसान करणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडते आहे. (Shirur News) सुरूवातीचा पाऊस रूसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मृगसरी कधी बरसणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
कांदा चाळीत कांदा पडून…
अवकाळी पाऊस, गारपिट, वादळी वारे यांने अक्षरशंः झोडपून काढले. त्यातून कांदा पिकाची काढणी करून तो कांदा चाळीत टाकला. पण बाजारभाव नसल्याने कांदा सध्या कांदा चाळीत पडून आहे. सुर्याने तिसरा डोळा उघडल्याने अंगाची लाही लाही झाली. उकाड्याने हैरान करून सोडले. त्यात शेतकरी विवाह सोहळे आटोपून पुर्व पावसाळी कामात गुंतला आहे. आता आस लागली आहे. ती मृगसरींची.
तालुक्यात या वर्षी खरीप हंगामाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. (Shirur News) तरी देखील पाऊसाची हजेरी महत्वाची ठरणारी आहे. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी चिंताग्रस्थ असून कृषी सेवा केंद्र चालकांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने खतांची विक्री केल्यास तत्काळ पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यास लेखी तक्रार करणे आवश्यक आहे.
मृग नक्षत्रातील पाऊसाच्या आगमनाने खरीप हंगामातील शेती व्यवसायास प्रारंभ होतो. शेतकरी पुर्व पावसाळी कामे आटोपून पेरणीची कामे करतो. यावर शेतकरी कुटूंबाची आर्थीक स्थिती अवलंबून असते. या काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. खरीप हंगामातील पिके जोमात कशी येतील याकडे बांधावर जाऊन माहिती द्यावी. योग्य खते, बियाणांची पुर्तता योग्य वेळेत व्हावी. शेतकऱ्यांनी देखील कृषी विभागाच्या सल्ल्याने शेती व शेती पुरक व्यवसाय करून आर्थीक स्तर उंचवला पाहिजे.
– दिलिप वळसे पाटील, माजी गृहमंत्री
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरुर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार
Shirur News : पावसाचा सांगावा आणणारा ‘चातक’ शिरूर ग्रामीणमध्ये आढळला : मनोहर म्हसेकर
Shirur News : सुट्टी संपली, शैक्षणिक वर्षाला सुरुवात, पर्यटनस्थळे रिकामी