Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : वर्षाऋतुचा चिंब भिजवून काढणारा सोहळा व्हावा… पावसाची प्रतिक्षा, शेतकरी चिंताग्रस्त

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 14 June 2023, 16:44

युनूस तांबोळी

Shirur News : शिरूर ः मेघ गर्जती सरी बरसती…असा जलधारांचा पाऊस निसर्गातल सौंदर्य अधिकच खुलवून काढतो. पण जागतीक तापमान वाढीचा परिणाम पाऊसावर देखील झालेला पहावयास मिळतो. त्यामुळेच निसर्गाच्या लहरीपणामुळे ऋतुचक्र उलटे फिरू लागल्याचे दिसून येते. मृग नक्षत्र सुरू होऊन देखील मृगधारा बरसण्यास तयार नाहीत. पाऊसाच्या आगमनावर बळीराजाचे स्वप्न अवलंबून असते. तू असा बरस की आसुसलेल्या जीवांना हिरव लेण पांघरायला मिळाव. वर्षा ऋतूचा चिंभ भिजून काढणारा सोहळा व्हावा. अशी आशा शेतकरी वरूणराजाकडे करू लागल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे.

शिरूर तालुक्यात मृग नक्षत्रातील पाऊसावर खरीप हंगामातील पिकांची गोडी निर्माण होते. गेले अनेक वर्षापासून कमी अधिक प्रमाणात पाऊसाच्या हजेरी दिसून येत आहे. चासकमान व डिंभा धरणाच्या पाण्यावर तसेच कुकडी प्रकल्पामुळे या भागात बागायती क्षेत्रात वाढ झालेली आहे. (Shirur News) काही भागात जलसंधारणाची कामे झाल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झालेली पहावयास मिळते. आंबेगाव- शिरूर या परिसरात माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील तर शिरूर हवेली या परिसरात आमदार अशोक पवार यांनी अनेक योजनेच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे.  ऋतूचक्र बदलल्याने केव्हाही पडणारा पाऊस यातून शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

तालुक्यात शेतकऱ्यांनी पुर्व पावसाळी कामे आटोपून खरीपाची तयारी केली आहे. रोहिणी नक्षत्र कोरडे गेले आता मृग नक्षत्र सुरू होवून आठवडा उलटला तरी पावसाने हजेरी लावली नाही. मेघ येतात आणि निघून जातात. पावसाळी वातावरण होऊन देखील पावसाची हजेरी ही शेतकऱ्यांला आभाळाकडे डोळे लावणारी ठरू लागली आहे.

 

सात जूनला येणारा वरूणराजा १४ जून आले तरी बरसत नसल्याने पाऊसा अरे पाऊसा..रूसलास का असेच म्हणण्याची वेळ आली आहे. अवेळी बरसून नुकसान करणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडते आहे. (Shirur News) सुरूवातीचा पाऊस रूसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मृगसरी कधी बरसणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

कांदा चाळीत कांदा पडून…

अवकाळी पाऊस, गारपिट, वादळी वारे यांने अक्षरशंः झोडपून काढले. त्यातून कांदा पिकाची काढणी करून तो कांदा चाळीत टाकला. पण बाजारभाव नसल्याने कांदा सध्या कांदा चाळीत पडून आहे. सुर्याने तिसरा डोळा उघडल्याने अंगाची लाही लाही झाली. उकाड्याने हैरान करून सोडले. त्यात शेतकरी विवाह सोहळे आटोपून पुर्व पावसाळी कामात गुंतला आहे. आता आस लागली आहे. ती मृगसरींची.
तालुक्यात या वर्षी खरीप हंगामाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. (Shirur News) तरी देखील पाऊसाची हजेरी महत्वाची ठरणारी आहे. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी चिंताग्रस्थ असून कृषी सेवा केंद्र चालकांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने खतांची विक्री केल्यास तत्काळ पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यास लेखी तक्रार करणे आवश्यक आहे.

 

मृग नक्षत्रातील पाऊसाच्या आगमनाने खरीप हंगामातील शेती व्यवसायास प्रारंभ होतो. शेतकरी पुर्व पावसाळी कामे आटोपून पेरणीची कामे करतो. यावर शेतकरी कुटूंबाची आर्थीक स्थिती अवलंबून असते. या काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. खरीप हंगामातील पिके जोमात कशी येतील याकडे बांधावर जाऊन माहिती द्यावी. योग्य खते, बियाणांची पुर्तता योग्य वेळेत व्हावी. शेतकऱ्यांनी देखील कृषी विभागाच्या सल्ल्याने शेती व शेती पुरक व्यवसाय करून आर्थीक स्तर उंचवला पाहिजे.
– दिलिप वळसे पाटील, माजी गृहमंत्री

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : शिरुर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

Shirur News : पावसाचा सांगावा आणणारा ‘चातक’ शिरूर ग्रामीणमध्ये आढळला : मनोहर म्हसेकर

Shirur News : सुट्टी संपली, शैक्षणिक वर्षाला सुरुवात, पर्यटनस्थळे रिकामी

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

Pimpri News : भोसरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp