योगेश मारणे
Shirur News : न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गुरुवारी (ता. २८) नव्वदाव्या दिवशी संप मागे घेतला आहे. कारखाना व्यवस्थापन व कामगार शिष्टमंडळ यांच्यामध्ये कारखाना आणि कारखान्याच्या सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेवून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारी (ता. २८) संध्याकाळी उशिरा संप मिटल्याचे कारखान्याच्या कामगारांच्या वतीने प्रतिनिधित्व करणारे कामगार महादेव मचाले, तात्यासाहेब शेलार व नानासाहेब मासाळ यांनी ‘पुणे प्राईम’शी बोलताना सांगितले.
कामगारांना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थकीत दोन पगार, पगारवाढीच्या फरकाचा एक हप्ता, हंगामी कर्मचाऱ्यांना रिटेंशन अलाउन्सचा एक हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एक थकीत पगार देण्यात येणार असून, डिसेंबर-२०२३ अखेर कामगारांची सर्व देणी देण्यात येणार असल्याचे कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत मान्यता देण्यात आली. (Shirur News ) या अटी मान्य करूनच संप मिटविण्यात आल्याचे प्रमुख कामगारांच्या शिष्टमंडळाने सांगितले.
कारखाना व्यवस्थापनाच्या बाजूने शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक पवार, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, नरेंद्र माने, शरद निंबाळकर, माजी संचालक दत्तात्रय फराटे, सागर राजेनिंबाळकर यांनी कामगारांचा संप मिटावा यासाठी कामगारांशी गुरुवारी (ता. २८) सकारात्मक चर्चा घडवून आणून संप मिटवला.
आमदार ॲड. अशोक पवार यांची यशस्वी खेळी
न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची आज दुपारी सर्वसाधारण सभा होती. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी मोठ्या राजकीय चातुर्याने कारखान्याच्या कामगारांचा संप मिटवला. (Shirur News ) सभेला होणारा विरोधकांचा विरोध लक्षात घेऊन, आमदार पवार यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला खेळी खेळताना काही प्रमाणात विरोधकांचा विरोध टोलवला आहे, अशी चर्चा तालुक्यात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : घनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी तिरसिंग जवळकर बिनविरोध
Shirur News : कवठे येमाई परिसरात मुसळधार पाऊस, ओढे-नाले लागले वाहू