युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : टाकळी हाजी – फाकटे रस्त्यावरील पुलाला कठडे नसल्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी व वाहचालाकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तातडीने या पुलावर कठडे बसवावेत. अशी मागणी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील नागरिकांनी केली आहे.
अपघातांचे प्रमाण वाढले; तात्काळ कार्यवाहीची नागरिकांची मागणी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी – फाकटे या रस्त्यावर चारचाकी वाहन पुलाला कठडे नसल्याने खाली कोसळल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( ता. १३) घडली होती. (Shirur News ) सुदैवाने कोणतीही जीवित हनी झाली नाही.
मात्र या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, पुलावरून खाली पडलेले वाहन हे बाहेरगावचे असल्याने त्यांना स्थानिक तरुण तसेच ग्रामस्थांनी मदत केली. यामध्ये संतोष पानगे ,रावसाहेब गावडे, भरत घोडे, स्वप्निल गावडे, संदीप सोदक, सौरव रासकर, जयदिप वरखडे ,पिराजी हवलदार आणि इतर साथीदारांनी मदत करत माणुसकी जपली.
या पुलावरून जात असताना चालकांना कठड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. होणारे प्रमाण वाढल्याने पुलावर कठडे बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (Shirur News ) तर अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याने ये जा करत आहेत, मात्र हा पूल दुर्लक्षित केला जात असल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखविली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शासन निर्णय : यंदा गणेशोत्सवात मिळतोय १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’..
Shirur News : विद्यार्थ्याना पर्यावरणपुरक श्री गणेश मुर्ती बनवण्याचे प्रशिक्षण..
Shirur News : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात पाणी अडवा प्रश्न पेटला