युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : स्पर्धात्मक युगात सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकू लागला आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये ग्रामिण भागातिल विद्यार्थ्यांना यश आलेले पहावयास मिळत आहे. पदवी किंवा इतर क्षेत्रातील कोर्सेस पुर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लगता विद्यार्थ्यांनी स्वतः चा उद्योग व्यवसाय उभा करावा. उद्योग व्यवसायीक क्षेत्रात करीयर करण्यासाठी परदेशात अधिक मागणि असते.से मत शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. मंचर (ता. आंबेगाव) येथे डिझाईन मेनी अँक या इन्स्टिट्यूट चे उद्घाटन माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. (Students should pursue a career in industry; Former Member of Parliament Shivajirao Adharao Patil)
ॲनिमेशन ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स हे प्रत्येक क्षेत्राचे अविभाज्य घटक
आढळराव म्हणाले की, ॲनिमेशन व इतर ग्राफिक डिझाईनिंग कोर्सेस चालू करण्यात आलेले असून सध्या ॲनिमेशन गेमिंग ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स मध्ये नोकरीसाठी प्रचंड मागणी आहे. तसेच भविष्यातही लाखो नोकऱ्यांची संधी ग्रामीण भागात उपलब्ध होणार आहे. (Shirur News) सध्या ॲनिमेशन ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स तंत्रज्ञान हे प्रत्येक क्षेत्राचे अविभाज्य घटक बनले आहे. आज उत्तर पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा कोर्सेसची शाखा या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व गरजूंना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी भिमाशंकर साखर कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखिले, राजाराम बाणखेले, तुकाराम शेवाळे, लांडेवाडी सरपंच अंकुश लांडे (Shirur News) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र गायकवाड यांनी केले. संचालक सदानंद शेवाळे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : कौतुकास्पद! वादन कला अवगत असलेला तरुण मुंबई लोहमार्ग पोलिस दलात भरती
Shirur News : रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती ग्लोबल स्कूलचा दहावीचा निकाल जाहिर