बापू जाधव
Shirur News : निमोणे : जालना जिल्हात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील निमोणे, गुनाट, शिंदोडी, न्हावरे, करडे, पिंपळसुटी परिसरात सकल मराठा समाजाच्या बंदच्या आवाहनाला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी गावोगावच्या बाजारपेठा बंद ठेवून, आंदोलनाला पाठिंबा दिला.
बंदच्या आवाहनाला अभुतपूर्व प्रतिसाद
निमोणे (ता. शिरूर) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सरपंच संजय काळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा घेण्यात आली. या वेळी सरकारने पोलीसी बळाचा वापर करुन आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून अर्धनग्न होत, (Shirur News) कपड्यांची होळी करण्यात आली. गावोगावी मूक मोर्चा काढून निषेध सभा घेण्यात आल्या. काही ठिकाणी गावच्या मुख्य चौकात टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला.
दरम्यान, आंदोलन काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शिरुर पोलीस निरिक्षक संजय जगताप , पोलीस उपनिरिक्षक सुजाता पाटील (Shirur News) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने जागोजागी भेट देऊन आंदोलकांची निवेदने स्विकारली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पारंपारीक वेशभूषा व हरिनामाच्या गजराने मुर्तीची सवाद्य मिरवणूक