Shirur News : शिरूर : प्राणी व पक्षांची भाषा समजून घेणे, ही देखील एक कला आहे. या मुक्या प्राण्यांना जवळ घेऊन, आपुलकीचा, मायेचा स्पर्श केला की त्यांची भाषा समजून घेणे सोपे जाते. प्राणी देखील प्रेमाची भाषा जाणून माणसाशी जुळवून घेतात. शिरूर तालुक्यातील एका अवलियाने प्राणी-पक्षांची भाषा अवगत केली आहे. या मुक्या जिवांशी तो अगदी प्रेमाने हितगुज साधतो. शेरखान शेख असे या प्राणी मित्र अवलियाचे नाव आहे. वनविभागाच्या मदतीने तो निसर्गातील जखमी पक्षी, प्राण्यांवर उपचार करतो. अनेक पक्षी, प्राण्यांना पाळण्याचा अनोखा छंद देखील तो जोपासत आहे.
सर्पमित्र व प्राणी मित्र म्हणून परिचित
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेरखान शेख यांना लहानपणापासून प्राणी-पक्षी पाळण्याचा छंद आहे. शिरुर तालुक्यात ते सर्पमित्र व प्राणी मित्र म्हणून परिचित आहे. सर्पमित्र म्हणून त्यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. पशु-पक्षांबाबत शासनाचे कायदे बदलल्यामुळे आवड असताना देखील काही प्राणी व पक्षी पाळण्यास मर्यादा येतात.(Shirur News) यामुळे शेरखान शेख यांनी अमेरिकन कन्नूर पोपट, सरड्यांच्या प्रजातीतील अमेरिकन इग्वाना, परदेशी पांढरे उंदीर, कोकाटील जातीचे पांढरे पोपट, फिंचेश यांसह पशु-पक्षी पाळले आहेत. सर्व पशु-पक्षांचे चांगल्या प्रकारे संगोपन करत त्यांची काळजी घेत आहेत. आजूबाजूचे अनेक नागरिक व युवक त्यांच्याजवळील प्राणी-पक्षी पाहण्यासाठी अनेकदा त्यांची भेट घेतात. पशु-पक्षांविषयी माहिती जाणून घेतात.
शेरवान शेख यांनी सर्प मित्र म्हणून वेगवेगळ्या प्रजातीच्या सापांना जिवदान दिले आहे. या सापांना वनात सोडण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. सध्या वनविभागाला सहकार्य म्हणून ते वनविभागाच्या रेस्क्यू टीममध्ये काम करताना पहावयास मिळतात.
याबाबत बोलताना शेख म्हणाले की, लहानपणापासून मला पशु-पक्षांची आवड आहे. परंतु शासनाच्या नियमानुसार आपण महाराष्ट्र वनविभागाच्या कायद्यांनुसार आपल्या भागातील कोणतेही पशु-पक्षी आपण पाळू शकत नाही. (Shirur News) माझा छंद जोपासण्यासाठी मी हे परदेशी पशु-पक्षी पाळल्याचे शेरखान शेख यांनी सांगितले.
निरूपद्रवी उंदीर
शिक्रापूर येथील शेरखान शेख यांनी पाळलेले पांढरे उंदीर हे माणसांमध्ये मिसळणारे, माणसांच्या आवाजावर बाहेर येणारे, अंगा-खांद्यावर खेळणारे असून, अन्य उंदरांप्रमाणे घरात कोणतेही नुकसान हे उंदीर करत नाहीत. उपद्रव नसलेले हे पांढरे उंदीर नागरिकांचे आकर्षण बनत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : बिबट्या-मानव संघर्षातून होणारे अपघात टळणार… की फक्त राजकारण होणार?
Shirur News : यात्रा-जत्रांमधून दिसणारी लोकनाट्य तमाशा ही शाश्वत अन् जिवंत कला