Shirur News : शिरूर, ता. १२ : पुणे, सांगवी येथे निळुफुले नाट्यगृहात पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने 16 व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने शाहिर विलास अटक यांचा सन्मानचिन्ह, व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, व शाल देऊन सन्मान
राज्यात तमाशा कलावंत म्हणून अटक यांचा नावलौकीक आहे. शाहिरी ढंगात पोवाडा व गिते गात असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. गाडी घुंगराला या त्यांच्या गिताला मागणी असते. जागरण गोंधळाचे कार्यक्रम त्यांचे प्रसिद्ध असून पुणे व नगर जिल्ह्यात त्यांना अधिक मागणी असते. पिंपरी चिंचवड कलाकार संघाने दखल घेऊन या कलावंताची सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरविले आहे.
यावेळी बेल्हे श्री साई दत्त नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप, संस्थापक अध्यक्ष विजय उलपे,कार्याध्यक्ष चित्रसेन भवर, संजय मगर, हेमा कोरबरी, राजेश जाधव, बाळासाहेब निकाळसे, माधवी सातपुते, अमिर शेख, मिठू पवार, विलास अटक, मिरा दळवी, आमन तांबे, फिरोज मुजावर, गणेश गायकवाड, के. जी. कड, शिल्पा भवार, मेघराज भोसले, अनिल गुंजाळ, अर्जून जाधव उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या वेळी गाडी घुंगराची आली थोरल्या भावाची हे गित रंगमचावर सादर केले. या गितावर नृत्यांगना व अभिनेत्री मंजू वाघमारे यांनी साथ देऊन नृत्य केले.