Shirur News : शिरूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळण्यासाठी उपोषनाचे आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी विठ्ठलवाडी (ता. शिरूर) ग्रामस्थांच्या वतीने भीमा नदीपात्रामध्ये अर्धनग्न बसून जल आंदोलन केले. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावामध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी भीमा नदीपात्रामध्ये अर्धनग्न बसून जल आंदोलन केले. (Shirur News) या वेळी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश सचिव जयेश शिंदे, माजी उपसरपंच दिलीप गवारे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष किसन गवारे, गणेश गवारे, अरविंद गवारे, राहुल गवारे, दादासाहेब दरेकर, शरद गवारे, रामदास गवारे, विराज शिंदे आदींनी भीमा नदीमध्ये अर्धनग्न बसून हातामध्ये भगवा घेऊन आंदोलन केले. या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी आदोलकांकडून करण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सणसवाडीत १४ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Shirur News : सविंदणे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च
Shirur News : सकल मराठा समाजाचा शिरूर शहरात भव्य कॅन्डल मोर्चा