Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: ‘साहेब, हा परिसर बिबटमुक्त करा’ मृत रोहनच्या वडिलांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आर्त विनवणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 6 November 2025, 19:37
Shirur News: 'Saheb, make this area leopard-free', a heartfelt plea from the father of deceased Rohan to Deputy Chief Minister Eknath Shinde

Pune Prime News

युनूस तांबोळी

शिरूर: “साहेब, मुलानं परिक्षेत 20 पैकी 18 मार्क मिळवले होते. लय (Shirur News) हुशार होता माझा (Pune News) रोहन पण बिबट्याने माझ्या डोळ्या समोर त्याच्यावर झडप टाकली मी वाचवायला गेलो पण माझ्यावर देथील बिबट्या गुरगुरल… रक्त्याच्या उलट्या केल्या अन् त्यच्या मानकुटाला धरून बिबट्याने शेताकडे ओढीत नेऊन ठार केल. पोटचा गोळा नेला अन व्हत्याच नव्हत झाल. अशी घटना परत नको. एकच करा हा परिसर बिबटमुक्त करा. आता बिबट्या नको” डोळ्यातून अश्रुंच्या धारा अन बिबट्याच्या हल्ल्यात बळी ठरलेल्या ‘रोहन’ चे वडील विलास हे गयावया करत होते. यावर “घाबरू नका आपण गांभीर्याने मार्ग काढू आणि हा परिसर कायमस्वरूपी बिबटमुक्त करू” असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड येथे ग्रामस्थांसमवेत या कुटूंबाचे सात्वंन करताना दिले.

 

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबूत येथे गेल्या वीस दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेले. या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी चेअरमन देवदत्त निकम, वनविभागाचे वरिष्ठ उपसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपसंरक्षक स्मिता राजहंस, शिवसेनेचे रमेश येवले, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय अधिकारी पुनम आहिरे, पोलिस निरीक्षक संदिप केंजळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या वीस दिवसात शिवन्या बोंबे ( वय- 5 वर्षे ) भागुबाई जाधव ( वय-70 वर्षे ) रोहन बोंबे ( वय 13 वर्षे ) यांचा बिबट हल्यात बळी गेला होता. त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री येथे आले होते. उपमुख्यमंत्री यांनी या वेळी परिसराची व रोहन विलास बोबे यांच्या घराची पहाणी केली.

यावेळी शिंदे म्हणाले की, या परिसरात बिबट्याच्या हल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दिवसा ढवळ्या या घटना घडू लागल्या आहेत. कुटूंबादेखत आपल्या मुलांवर बिबट हल्ले होत आहेत. कुटुंबांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गोष्ट गांभिर्याने घेत असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रशासन यांच्याशी चर्चा करणारआहे. या भागात पानंद रस्त्यांची गरज असून शेतकऱ्यांनी जागा दिली तर पुढील काळात रस्ते करणार. यासाठी मंत्री शिरसाट यांना या भागाचा दौरा करायला सांगू. यापुढे एकही बिबट हल्ला होणार नाही. याची काळजी घेतली जाईल. यासाठी हा परिसर कायम स्वरूपी बिबटमुक्त करणार. वनविभागाने सर्व यंत्रणा वापरून हा परिसर बिबट मुक्त करावा. असे आदेश दिले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09

सलूनमध्ये हेअर स्पा करायला गेली महिला; स्पा करताना डोळे बंद केले अन् घडला विचित्र प्रकार, सलून मालकाने जबरदस्ती किस केलं अन्…

Friday, 5 June 2026, 18:51

टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट्स; झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले अन् तरुणीला

Friday, 5 June 2026, 18:29
Next Post
Viral News: Husband called his boyfriend when he was not at home; Husband suddenly rushed, saw his boyfriend hiding in the bed and...

Viral News: नवरा घरी नसतांना बॉयफ्रेंडला बोलावलं; नवऱ्याची अचानक धाड, बेडमध्ये लपलेला बॉयफ्रेंड दिसला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.