Shirur News शिरूर : रिमझीम पावसाच्या सरीत सामाजीक सलोख्याचे दर्शन घडवत मुस्लिम बांधवांकडून ईद- उल – अजहा (बकरी ईद ) उत्साहात साजरी करण्यात आली. (Shirur News) शहरात, ग्रामिण भागात सुख शांती आणि धार्मीक सलोखा एकोपा नांदो अशी अल्ला कडे दुवा करण्यात आली. (Shirur News)
शिरूर तालुक्याच्या बेट भागातील मुस्लिम बांधवांनी सामुदायीक नमाज पठण
शिरूर तालुक्याच्या बेट भागातील मुस्लिम बांधवांनी पावसाच्या सरी येत असल्याने ईदगाह मैदाना ऐवजी मसजीद मध्ये सामुदायीक नमाज पठण केले. यावेळी मौलानांनी खुदबा पठण केले. त्यानंतर फातीया पठण करण्यात आले. (Shirur News) सलाम पठण करून ईदच्या नमाजाची सांगता झाली. सगळीकडे एकोपा नांदो तसेच देशावरील संकट दुर होवो अशी दुवा करण्यात आली. नमाजची सांगता झाल्यावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. (Shirur News)
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील सुन्नी मुस्लिम जमात मसजीद मध्ये मौलाना अब्दुल रज्जाक यांनी नमाज पठण करून खुदाबा पठण केले. यावेळी दुवा करताना ते म्हणाले की, हजरत इब्राहिम व त्यांचे चिंरजीव हरत इस्माईल यांनी दाखविलेल्या अतुलनिय त्यागाचे स्मरण असलेली ईद-उल-अजहा (बकरी-ईद) शांततेत साजरी करा. हे अल्ला, ‘भरपूर पाऊस पडू दे’ ‘देशात सुख शांती लाभू दे’ ‘सर्वांच्या हाताला काम दे’ ‘सर्वांच्या आयुष्यात भरपूर सुख समृद्धी आण’ अशी पार्थना करून तसे साकडे अल्ला कडे घालण्यात आले.
मलठण ( ता. शिरूर ) येथे मौलाना अब्दुल अन्सारी यांनी नमाज पठण केले. अन्सारी म्हणाले की, अल्लाच्या प्रसन्नतेसाठी वाईट इच्छांचा त्याग करा. केवळ संपत्ती आणि पैसा खर्च करावायाचा नाही.तर आपल्याकडे त्यागाची खरी भावना जागृत करणे महत्वाचे असते.
कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथे मौलाना अफसर शहा यांनी मसजीद मध्ये सामुदायीक नमाज पठण केले. उपदेश करताना ते म्हणाले की, इस्लाम मध्ये शिक्षणाला जेवढे महत्व दिले जाते. तेवढेच महत्व चांगल्या आचरणाला दिले जाते. खोटा अंहकार, वाईट इच्छा, आणि स्वार्थाचा त्याग केला पाहिजे. त्यातून एक चांगली आणि उपयुक्त व्यक्ती बनणे हे शिकवणे गरजेचे आहे. शिरूर तालुक्यात सगळ्याच ठिकाणी शुक्रवार ( ता. ३० ) कुर्बानीचा विधी शांततेत पार पडला.