धनंजय साळवे
Shirur News : कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येथे परमेश्वर दत्तात्रय बोटकर (वय २१) या तरुणावर बिबट्याने मंगळवारी (ता. ६) हल्ला केल्याची घटना घडली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांनी या तरुणाची रविवारी (ता. १०) प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेतली आणि घटनेची माहिती घेत तब्येतीची विचारपूस केली. या वेळी त्यांनी तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले.
जखमी तरुणाला शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी
दरम्यान, मागील आठवड्यात बोटकर या तरुणावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. छातीवर पंजा मारुन, पायाला जबड्यात पकडले होते. (Shirur News) परंतु त्याने न घाबरता बिबट्याचा प्रतिकार केला होता. या हल्ल्यात तरुण जखमी झाला होता. हा तरुण सध्या धोक्याच्या बाहेर पडला असला, तरी त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरूच आहेत.
या तरुणाची बांदल यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यासमवेत माजी सरपंच बबनराव पोकळे, उद्योजक रामभाऊ गायकवाड, पत्रकार विजय कानसकर, हरी मूलमुले, अतुल हिलाळ उपस्थित होते. (Shirur News) या तरुणाला मदत मिळवून देण्यासाठी समाजातील जाणकार व दानशुर व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे, असे पोकळे यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, अन्न व पाण्याची उपलब्धता होत असल्याने बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. नागरिकांनी वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या परिसरात वनखात्याने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा. (Shirur News) घराभोवती कंपाउंडची व्यवस्था करावी तसेच जखमी तरुणाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जांबूत गावात उस्फूर्त बंद
Shirur News : ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या शैक्षणिक संस्थेचा ८३ वा वर्धापन दिन साजरा
Shirur News : विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्याबाबतचे धोके ओळखावे : दिलीप वळसे पाटील