युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर ः चैत्रापेक्षाही वैशाखात उष्णतेचा पारा चढलेला असतो. सध्या तापमान ४० अंशापेक्षाही अधिक वाढल्याने जीवाची लाही लाही होत आहे. पण जवळच्या नातेवाईकाच्या सुख दुखांत जाणारा माणूस कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे थांबवत नाही. मिळेल त्या साधनाने प्रवास करत सकाळच्या दशक्रिया असो की लग्न समारंभाला हजेरी ही ठरलेलीच असते. मात्र या कार्यक्रमांना आलेले नेते मंडळी मात्र अशाही उन्हाच्या तडाख्यात माईक सोडेनात.’उन्हाचा चटका लागू द्या, पण नेत्याचे भाषण होऊ द्या’… असे चित्र आजही गावागावात पहावयास मिळत आहे. पण वातानुकूलित गाडीत आलेल्या नेते मंडळीवर याचा परिणाम होत नसून सर्व सामान्य नागरिक मात्र त्यांच्या वक्तव्यांवर गप्प बसून उन्हात होरपळून निघत आहे. (‘Let the heat of the sun apply; But let the leader speak’…”Leaders don’t let go of the mic even in a heat wave”)
दशक्रिया विधी अन लग्न समारंभात नागरिकांना उष्णतेचा तडाखा
सध्या सुर्यनारायणाचे दर्शन सकाळी लवकरच होत असून तो देखील सकाळपासून लालबूंद अवस्थेत दिसू लागला आहे. त्यामुळे ऐरवी आठ वाजता सुरू होणारी दशक्रिया विधी सकाळी सात वाजता सुरू केली जात आहे. जवळपास नामवंत प्रवचनकाराचे प्रवचन तासभर चालते. त्यातून समाजाला प्रबोधन व्हावे हा उद्दात्त दृष्टिकोन आहे. जवळच्या नातेवाईकाच्या किंवा मित्र परिवाराच्या दुखात सामिल होऊन त्या कुटूंबाचे दुख कमी करण्याचा हा प्रामाणिक विचार असतो. (Shirur News) पण त्यामुळे सकाळपासून डोक्यावर छत नसलेल्या ठिकाणी ताटकळत थांबावे लागते. काकस्पर्श होईपर्यंत कसेही नऊ वाजलेले असतात. या काळात सुर्यनारायण चांगलाच तापलेला असतो. त्यानंतर नेते मंडळी श्रद्धांजली पर भाषण सुरू करतात. या भाषणात खरे तर त्या दुखावलेल्या कुटूंबाची व्यथा किंवा समाजासाठी त्याने केलेले योगदान किंवा कुटूंबाचा संदर्भ असतो. प्रत्येकाच्या तोंडून हेच वारंवार सांगितले जाते. यामध्ये तासभर तरी जातो. पण या काळात तीन तास उन्हात बसलेले श्रोते मात्र अक्षरक्षः उकडून उन्हाने होरपळून निघतात. या काळात समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनात काय चालले असेल याचा ठावठिकाणा नेते मंडळीना नसतो. (Shirur News)
नुकत्याच चांडोह ( ता. शिरूर ) येथील एका दशक्रिया विधीसाठी जायचा प्रसंग आला. त्या ठिकाणी जवळपास साडेनऊ वाजले होते. यावेळी शेतकरी संघटनेचा नेता श्रद्धांजली वाहण्यास उभा राहिला. त्यावेळी तो म्हणाला की, मी जास्त वेळ बोलणार नाही. कारण उन जास्त झाले असून तुमची परिस्थिती समजू शकतो. असे बोलून त्याने भाषणास सुरूवात केली. पण तेवढ्यात खालून एकजण म्हणाला की, काय नाय तुम्ही बोला. आमच काय आम्ही उन्हात होरपळून निघू पण तुमच भाषण झाल पाहिजे.(Shirur News) पण या नेत्याने मात्र अगदी थोडक्यात आपली श्रद्धाजंली वाहिली. कार्यक्रम संपल्यावर मात्र एक माजी तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणाला की, अहो आम्हि किती वेळ बसू पण तुमच्या भाषणात विकासाच काहिच नाही. तिच तिच भाषण कव्हर ऐकायची. त्यापेक्षा शासकिय निधी आणून या ठिकाणि सावलीसाठी शेड करता येईल का ते पहा. हे त्यांचे बोलणे अनेकजणांना टोचत असले तरी उन्हाळा पावसाळ्यात दशक्रियेसाठी एकत्रीत येणाऱ्या नागरिकांच्या हिताचे होते.
सध्या लग्नसराई मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. वाढलेला उष्णतेचा पारा यातून या वऱ्हाडी मंडळीची सुटका झालेली नाही. ल्गन म्हणजे दोन जीवाचे मिलन आणि मंगलमय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जवळच्या मित्र परीवार व नातेवाईकांची असणारी घडपड महत्वाची ठरते. कमी तिथ यामुळे एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात असणारे विवाह यामुळे सर्वांचीच तारांबळ उडताना दिसते. मात्र या उन्हाच्या तडाख्यातही तास न तास डिजेवर नाचणारी तरूणाई पहावयास मिळते. डिजेमुळे छातीचा त्रास होऊन मृ्त्यूच्या घटना घडत आहेत. डिजेवर बंदी असतानाही बहुतेक वराती व लग्न समारंभात डीजे सर्रास वाजवीला जातो. (Shirur News) पोलिस देखील याकडे नजर चूकवून आर्थीक हितसंबध साधतात की काय असा ही प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो. तास न तास नाचणाऱ्या तरूणाईमुळे लग्न सोहळ्याला उशीर होतो. त्यातून बंदिस्त मंगल कार्यालयात अक्षरक्षः होरपळून निघतात. कार्यमालक थंडपेय, मठ्ठा सारखे पेय देऊन स्वागत करत असला तरीही उन्हाच्या तडाख्यात ही थंडपेय देखील व्यर्थ ठरतात.
कार्य मालकाची भेट घेऊन अक्षदा वधुवरांच्या डोक्यावर टाकून पुढील लग्न कार्याला जावे. यासाठी सगळ्यांचीच धडपड असते. मात्र लग्न सुरू होण्याच्या कालावधीत नेते मंडळीच्या शुभेच्छा सुरू होतात. त्यामुळे मंगल कार्यालयात ताडकळत बसणारे वऱ्हाडी मंडळीची मनाची परिस्थिती वेगळी असते. (Shirur News) या भाषणातही दोन्ही वरवधू कडील कुटूंबा बाबत संभाषण केले जाते. प्रत्येक कार्यालयात या कुटूंबाबाबत माहिती देण्यासाठी निवेदक ठेवलेले असतात. पण तरीही ही नेते मंडळी या कुटूंबाबाबत बोलत असतात. त्यात वेगळेपण काहिच नसते. येथेही पुढच्या लग्नाला जायचय, शुभेच्छा उरका, लग्न लावून घ्या अशा कानपिचक्या लग्नसमारंभा स्थळातून येतात. हे काय नवल नाही.