युनूस तांबोळी
शिरूर Shirur News : सहकारी संस्था ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या असल्याने त्या भरभराटीला आणणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा माझ्या कामावर विश्वास असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्याकरीता अहोरात्र झटत राहणार. (Shirur News) शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्नास यामुळेच निवडणूक लढवली आणि जिंकली. भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या बिबट्याचा बंदोबस्त, विज, पाणि समस्यांसाठी ‘हटायचे नाही तर लढायचे’. (Shirur News) या प्रश्नासाठी भविष्यात पुणे या ठिकाणी आंदोलन करावे लागले तरीही आंदोलन करणार. (Shirur News) यासाठी शेतकऱ्यांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. (Shirur News) असे मत आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी व्यक्त केले. (Shirur News)
पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथे आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचीत संचालक देवदत्त निकम यांचा नागरी सत्कार आयोजीत करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष माऊली ढोमे, उपसरपंच विकास वरे, कृषी पर्यवेक्षक ए. बी. जोरी, रामदास ढोमे, सत्यवान पोखरकर, गणेश यादव, जयवंत बोंबे, संपत पानमंद, किरण ढोमे , शरद बोंबे, विकास वरे, बळवंत बोंबे, अरूण ढोमे,शिवाजीराव बोंबे, बबनराव बोंबे, ज्योती बोंबे, गोवींद खांडगे, भाऊसाहेब औटी, पोलिस पाटिल सर्जेराव बोर्हाडे, रखमा निचीत, संपतराव पानमंद, नानाभाऊ गावशेते, कोंडीभाऊ पवार, निवृत्ती बोंबे, रामदास दरेकर, लक्ष्मण गायकवाड, भाऊसाहेब ढोमे, दिलीप बोंबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्द…
माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिलेल्या संधीमुळे भिमाशंकर सहकारी साखर कारखाना देशात एक नंबर केला. आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देशात डिजीटल करून दाखवली. शेतकऱ्यांच्या सुखदुखात राहून मी विकासाची काम केली. पण काहि लोकांनी मला बाजार समितीतून हटवा.असे धोरण घेतले. पण मी साहेबांना एकच सांगितले की, मी शेतकऱ्याचे हिताचे काम केले आहे.त्यांच्या समोर मला एकदा जाऊ द्या.ते ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल. मी एकदा लढण्याचा निर्णय घेतला तो मी मागे घेणार नाही. कोणत्याही पक्षात न जाता मी अपक्ष उभा राहिलो. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केल्याने निवडून येऊन मला पुन्हा संधी मिळाली. हे माझ्या रांत्रदिवस केलेल्या समाज कार्याचे श्रेय आहे. यापुढेही तुमच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्द आहे. असेही निकम यांनी सांगितले.
राज्यात कृषी पर्यवेक्षक पदासाठी प्रथम आलेले ए.बी. जोरी यांचाही पिंपरखेड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामूआण्णा दाभाडे, सुञसंचालन शाकूराव कोरडे यांनी केले. तर आभार उपसरपंच विकास वरे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : “विचार तुमचे लिखाण आमचे” ‘निसर्गातल म्हतारपण’ मुलांसमवेत अनोखी वयोवृद्धांची सहल
Shirur News | लोकसहभाग आणि नाम फाऊंडेशन करणार पाणीदार गाव ; ओढा खोलीकरण व ४२ तलावांची निर्मिती…