युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने शाळेभोवती तारेचे कंपाऊड तयार करण्याचे ठरले असून, त्यासाठी जवळपास १ लाख १५ हजार रूपयांचा निधी गोळा झाल्याची माहिती मुख्याध्यापक पी. सी. बारहाते यांनी दिली.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यातून पावसाने हजेरी लावल्याने बिबट प्रवण क्षेत्रातील बिबटे मानव वस्तीकडे अन्नच्या शोधात भटकत आहेत. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर, मैदानात व शौचालय परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. बिबट्याच्या पावलांचे ठसे याठिकाणी आढळून आले होते. (Shirur News) यामुळे चिमुरड्या मुलांना शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
…अन्यथा शिरूर वनविभागावर मोर्चा
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात पिंपरखेडची जिल्हा परिषद शाळा नावारुपाला आली आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे या भागात बिबट्याचा वावर वाढलाय का? अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत होती. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याची दहशत वाढलेली असताना देखील वनविभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने अनेक समस्यांना सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. (Shirur News) तत्काळ या भागात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करा. शाळेतील मुलांवर कोणतेही संकट येणार नाही, यासाठी काळजी घ्या. अन्यथा शिरूर वनविभागावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शालेय व्यवस्थापन समितीने दिला आहे.
या ग्रामस्थांनी जागरूक होऊन तातडीची बैठक आयोजित केली होती. त्यातून जवळपास १ लाख १५ हजार रूपयांचे तारेचे संरक्षक कुंपण बांधण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी किरण ढोमे प्रफुल्ल बोंबे व नरेंद्र बोंबे यांनी पुढाकार घेतला आहे. (Shirur News) पिंपरखेड येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रिडा, कला व गुणवत्तेत जिल्ह्यात नावलौकीक मिळवणारी आहे. बिबटचा शाळेच्या क्रिंडागणावरील वावर हा मुलांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहणारा होता. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन तारेचे कंपाउडचे काम सुरू करण्यात आले आहे, असे मुख्याध्यापक बारहाते यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : टाकळी हाजीत वारंवार वीजपुरवठा खंडित; अनुभवी वायरमन देण्याची ग्रामस्थांची मागणी