Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : खाकी वर्दीला न जुमानता चोरीचे सत्र सुरूच; गुन्ह्यांची उकल करण्याचे शिरूर पोलिसांसमोर आव्हान

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 12 October 2023, 11:40

साहेबराव लोखंडे
Shirur News : टाकळी हाजी : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विजेच्या तारा (केबल), विद्युत रोहित्र, कृषी पंप तसेच घरफोडी व चोरीचे सत्र सुरूच आहे. नुकतेच सविंदणे, कवठे येमाई येथे विद्युत रोहित्र चोरी, आमदाबाद येथे घरफोडी झाल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी केबल तसेच कृषी पंप चोरांवर कारवाई केली होती. त्यावेळी काही गुन्ह्यांची उकल झाली. मात्र, इतर चोऱ्यांच्या तपासाबाबत पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात घोड आणि कुकडी नदीवरून पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे या भागात ८५ टक्के शेती बागायती झाली आहे. (Shirur News) या भागात टाकळी हाजी, आमदाबाद, वडनेर, कवठे येमाई, निमगाव दुडे, चांडोह, पिंपरखेड, जांबूत, काठापूर, म्हसे, माळवाडी, शरदवाडी, फाकटे तसेच सविंदणे, रावडेवाडी, मलठण या गावांतील कृषी साहित्य चोरीच्या तक्रारी शिरूर पोलिसांत दाखल झाल्या आहेत. त्यांचा तपास लावण्यात शिरूर पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.

शिरूरच्या बेट भागात चोरट्यांनी फोडलेली कृषी साहित्य, खते-औषधांची दुकाने, किराणा दुकाने तसेच घरफोड्या या घटनांचा तपास आजतागायत लागलेला नाही. (Shirur News) यामध्ये टाकळी हाजीतील दोन निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरातील घरफोडीचाही समावेश आहे.

मंदिरातील चोऱ्यांबाबत यापूर्वीच्या काही घटनांतील आरोपींचा शोध लागलेला नसताना, नुकतेच आमदाबाद येथील मंदिरात चोरी झाल्याने या चोरांना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेले शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सुरुवातीच्या काळात गावोगावी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारत एक दबंग अधिकारी अशी ओळख निर्माण केली होती.(Shirur News)  त्या दरम्यान अवैध धंदे तसेच चोऱ्यांचे प्रकार थांबले होते. सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनीही काही कारवाया केल्या होत्या. मात्र चोरट्यांमध्ये खाकीची दहशत राहिली नाही, अशी चर्चा होत आहे.

 

ग्रामसुरक्षा दल सक्रिय

अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाकाबंदी तसेच रात्रीच्या वेळी गस्तीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्रामसुरक्षा दले सक्रिय करण्यात येत आहेत, असे शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन; पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Shirur News : अख्खं गाव हळहळलं..! वडिलांचे निधन होऊन दहा दिवस होण्याच्या अगोदरच मुलाचाही चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू..

Shirur News : शिरूरमध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांनी जपला सामाजिक, धार्मिक सलोखा

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

RTE Admission: पूर्व हवेलीत बोगस रहिवासी दाखल्यांसह धनदांडग्यांच्या मुलांना आरटीईत प्रवेश? खेडमध्ये 14 पालकांवर गुन्हा दाखल; हवेलीत कधी होणार गुन्हा दाखल?

Monday, 5 October 2026, 11:18

खेड येथे पत्रकाराचे घर फोडून 1 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज लंपास; तिघांवर संशय

Monday, 5 October 2026, 11:08

मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरायला गेला, धबधब्याच्या कुंडात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 5 October 2026, 10:57

Gold Price Today: ग्राहकांना दिलासा की खरेदीची संधी? सोनं-चांदी दोन्ही स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे दर

Monday, 5 October 2026, 10:50

बालेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या अन् नंतर…

Monday, 5 October 2026, 9:47

पिस्तूल हातात घेतलं अन् धाडकन गोळी सुटून तरुणाच्या पार्श्वभागात लागली; बिबवेवाडीतील घटना

Monday, 5 October 2026, 9:22
Next Post

Shirur News : टाकळी हाजीत वारंवार वीजपुरवठा खंडित; अनुभवी वायरमन देण्याची ग्रामस्थांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp