Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 November 2026, 17:26

उरुळी कांचन, ता. 27 : पुणे-सोलापूर महामार्गावरील वेगाने विकसित होणाऱ्या आणि पंचक्रोशीतील 16 ते 17 गावांचे प्रमुख केंद्र असलेल्या उरुळी कांचनमध्ये सध्या प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती झाली आहे. पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेल्या तीन प्रमुख यंत्रणांची सूत्रे महिलांच्या हाती असल्याने गावात सध्या ‘महिला राज’ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मात्र, पदांवरील नियुक्तीबरोबरच नागरिकांच्या अपेक्षाही मोठ्या असून, स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या महिला अधिकारी किती प्रभावीपणे काम करणार, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी विजयमाला पवार कार्यरत आहेत. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण, अवैध धंद्यांवर कारवाई आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक नियोजन ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. परिसरातील वाढत्या अपघातांच्या घटना, चोरीचे प्रकार आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महिला नेतृत्वाखाली या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होऊन नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उरुळी कांचन महसूल मंडळाच्या मंडलाधिकारीपदी माधुरी बागले मागील एक ते दीड वर्षापासून कार्यरत आहेत. जमिनीच्या नोंदी, सातबारा उतारे, फेरफार, वारस नोंदी, उताऱ्यांमधील दुरुस्ती, शेतजमिनीशी संबंधित प्रश्न आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान पंचनामे करून अहवाल तहसीलदारांकडे सादर करणे, अशा विविध जबाबदाऱ्या त्या सांभाळत आहेत.

तंटामुक्ती, प्रशासकीय व कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन, निवडणूक कामकाज, मतदार याद्या व मतदान केंद्रांचे नियोजन तसेच ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यात समन्वय साधून नागरिकांच्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कामही मंडलाधिकारी म्हणून त्यांच्याकडे आहे.

विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिरे आणि प्रशासकीय उपक्रमांच्या माध्यमातून कामकाज करण्यात येत आहे. उत्पन्न, वय, अधिवास आणि रहिवासी प्रमाणपत्रे, शिधापत्रिकेसंबंधी नवीन अर्ज, दुबार शिधापत्रिका, दुरुस्ती, अॅग्रीस्टॅक आणि पीएम किसानसारख्या योजनांशी संबंधित कामे मार्गी लावण्यावर भर दिला जात आहे. प्रशासन आणि लोकसहभाग यांच्यात समन्वय साधून कामकाजात पारदर्शकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उरुळी कांचनच्या तलाठीपदी प्रियांका सुंदरडे कार्यरत आहेत. गावपातळीवरील महसूल प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा म्हणून जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे, महसूलविषयक कामकाज, प्रशासकीय अहवाल तयार करणे, निवडणूक प्रक्रियेत मदत, गायरान जमीन, सरकारी मालमत्ता, जमिनीच्या हद्दीच्या खुणा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे यांसारख्या कामांमध्ये तलाठी पदाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे गावातील महसूलविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीत तलाठी कार्यालयाकडून नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी जयश्री बेनके कार्यरत आहेत. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरी सुविधा, स्थानिक विकासकामे आणि प्रशासकीय नियोजनाची जबाबदारी त्यांच्या माध्यमातून पार पाडली जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या नागरी समस्यांचे निराकरण, मूलभूत सुविधांची उपलब्धता आणि विकासकामांना गती देणे ही ग्रामपंचायत प्रशासनासमोरील प्रमुख आव्हाने आहेत.

दरम्यान, उरुळी कांचन आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत या महिला अधिकारी आपल्या कामातून किती ठसा उमटवतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26

“उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर…” पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Friday, 27 November 2026, 17:25

पुण्यातील गुन्हेगारांना आता खैर नाही! पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा पोलिसांना थेट इशारा; कोयता गँग, ड्रग्ज माफिया अन् अवैध शस्त्रधारकांवर होणार मोठी कारवाई!

Friday, 27 November 2026, 16:39

लोकसभेचा नकाशाच बदलणार! महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून थेट ७२ होणार? ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन!

Friday, 27 November 2026, 16:16

वाघोलीसह पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा! आमदार माऊली आबा कटके यांची पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

Friday, 27 November 2026, 16:14

कॅम्प परिसरात बेवारस बॅग, बॉम्ब असल्याचा संशय अन् पोलिसांची घटनास्थळी धाव; बॉम्बशोधक पथकानं परिसर खाली केला अन् झडती घेताच…

Friday, 27 November 2026, 14:45
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp