अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे : कोंढापुरी (ता. शिरुर) येथील सुल्झर इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या वेअर हाऊस मधून चक्क सुरक्षा रक्षकाने शटर उघडून दोघा साथीदारांच्या मदतीने तब्बल २७ लाख रुपयांचे स्टील साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शिरुर तालुक्यातील कोंढापुरीतील घटना
सुरक्षा रक्षक अन्नाप्पा सिद्धाप्पा मोदी (रा. शिक्रापूर, ता. शिरुर जि. पुणे) याच्या सह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shirur News ) याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक बसवराज गुरुया आलाळमठ (वय ४९, रा. वूड्स व्ह्याली बोऱ्हाडेवाडी, मोशी पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढापुरी (ता. शिरुर) येथील सुल्झर इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या वेअर हाऊस मध्ये कंपनीला लागणारे स्टेनलेस स्टीलचे साहित्य ठेवण्यात येते. (Shirur News ) सदर ठिकाणी कंपनीचे कामगार गेले असताना त्यांना त्या ठिकाणी ठेवलेले साहित्य दिसले नाही. तसेच काही साहित्य कमी असल्याचे आढळून आले.
त्यानंतर कंपनीतील कामगारांनी या घटनेची माहिती व्यवस्थापकाला दिली. कंपनीच्या वेअर हाउस मधील साहित्यांची तपासणी केली असता लाखो रुपयांचे साहित्य नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, कंपनी व्यवस्थापकने सीसीटीव्ही तपासले असता कंपनीतील सुरक्षा रक्षक असलेल्या अन्नाप्पा मोदी याने तो रात्रपाळीमध्ये असताना, त्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने कंपनीतील तब्बल सत्तावीस लाख रुपये किमतीचे स्टील साहित्य लांबवल्याचे समोर आले. (Shirur News ) पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : टाकळी हाजी – फाकटे रस्त्यावरील पुलाला कठडे बसविण्याची मागणी
Shirur News : शासन निर्णय : यंदा गणेशोत्सवात मिळतोय १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’..
Shirur News : विद्यार्थ्याना पर्यावरणपुरक श्री गणेश मुर्ती बनवण्याचे प्रशिक्षण..