Shirur News : शिक्रापूर, (पुणे) : भंगार व्यावसायिकाच्या दुकानात कामाला असलेल्या कामगाराने दुकानातील १ लाख ८० हजार रुपयांचे भंगार चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भंगार व्यावसायिकाने कामगाराविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद
दर्जाराम लुबाराम चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कानाराम दीपारामजी चौधरी (वय ३४, रा. शिक्रापूर, ता. शिरूर मूळ रा. सणवाडा, ता. रेवदर, जि. सिरोही, राजस्थान) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील वाबळेवाडी येथे कानाराम चौधरी यांचे भंगाराचे गोडाऊन आहे. खरेदी केलेले भंगार ते या गोडाऊनमध्ये ठेवत असतात. (Shirur News ) मंगळवारी (ता. ०१) रात्रीच्या सुमारास कानाराम गोडाऊन बंद करून घरी गेले.
त्यानंतर दुसर्या दिवशी पुन्हा गोडाऊनमध्ये आले असताना त्यांना गोडाऊनमधील काही माल कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पूर्ण पाहणी केली असता गोडाऊनमधील ६ हजार किलो वजनाचे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे भंगार चोरीला गेल्याचे दिसून आले. (Shirur News ) त्यांनी कामगार दर्जाराम चौधरी याच्याशी चर्चा केली असता तो संशयास्पद व उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर दर्जाराम हा मोबाईल बंद करून निघून गेला. चौकशी केली असता कामगार दर्जारामने टेम्पो मधून हे भंगार साहित्य चोरून नेल्याचे समोर आले.
दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी दर्जाराम लुबाराम चौधरी (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.(Shirur News ) पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल दांडगे या घटनेचा तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : जमिनीच्या वादातून जमावाकडून दाम्पत्याला मारहाण; निमगाव म्हाळुंगीतील घटना;