अमिन मुलाणी
Shirur News : सविंदणे : बंदूकधारी पोलिसांचा फौजफाटा, लाठी-काठीधारी पोलीस, रुग्णवाहिका आणि जमावाला थोपविण्याचे थरारनाट्य… शिरूर शहरातील नागरिकांनी आज मॉक ड्रीलचा थरार अनुभवला. दंगलसदृश्य परिस्थिती हाताळण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिरूर बस स्थानकासमोर पोलिसांनी मॉक ड्रिलचे आयोजन केले होते.
शिरूरकरांनी अनुभवला मॉक ड्रीलचा थरार!
शहरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास, ही परिस्थिती हाताळण्याबाबतची रंगीत तालीम सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिरूर बसस्थानकासमोर पोलीस यंत्रणा व अन्य यंत्रणांच्या उपस्थितीत करण्यात आली. (Shirur News) या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह अन्य सहा पोलीस अधिकारी, ३० पोलीस, ९ महिला पोलीस, ९ प्रविष्ट पोलीस यांच्यासह १० गृहरक्षक दलाचे जवानांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी व पोलीस निरीक्षक संजय जगताप म्हणाले की, गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त व अन्य शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधला जावा, यासाठीची रंगीत तालीम आज करण्यात आली. (Shirur News) यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं…! शेत शिवारावर बाजरीचे पिक डोलू लागले
Shirur News : शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचा भाग डोक्यात पडल्याने महिला जखमी
Shirur News : गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हा दाखल करा; सकल मातंग समाजाची मागणी