Shirur News : शिरूर : ‘भावी आमदार देवदत्त निकम म्हणायला काही हरकत नाही’ अस म्हटल्यावर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत गाडेमालक व शौकीनांनी दाद दिली. मला माहित आहे ‘तुमच्या मनात आहे आणि माझ्या ओठावर आल एवढाच काय तो फरक’ अस सांगत शिरूर चे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी शिंदेवाडी येथील बैलगाडा घाटातील शौकीनांना व गाडे मालकांना यात्रेनिमित्त भरविलेल्या बैलगाडा शर्यतींना शुभेच्छा दिल्या. (Shirur News)
बैलगाडा शर्यतींना शुभेच्छा…
मलठण (ता.शिरूर) शिंदेवाडी येथे वनमहादेव, रोकडोबा व बिरोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोल्हे बोलत होते. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार, भिमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, नाना फुलसुंदर, शिंदेवाडी व मलठण येथील ग्रामस्थ, परीसरातील बैलगाडा शौकीन उपस्थित होते. (Shirur News)
या यात्रेनिमित्त भरलेल्या बैलगाडा शर्यतीला तब्बल १२५७ बैलगाडा मालकांनी भाग घेतला. (Shirur News)
राज्याच्या राजकारणात बदल होऊन राष्ट्रवादी कॅाग्रेसचे दोन गट पहावयास मिळू लागले आहे. त्यातून जेष्ठ नेते शरद पवार यांचा एक गट तर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा दुसरा गट तयार झालेला पहावयास मिळत आहे. आमदार दिलिप वळसे पाटिल यांनी दुसऱ्या गटा सोबत जाण्याचा निर्णय घेत सहकार मंत्री पदाची धुरा संभाळली आहे. त्यातून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात त्याचा परीणाम दिसू लागला आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारल्याने भिमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष व मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी राष्टवादीचे जेष्ट नेते शरद पवार यांना समर्थन दिले. तिकीट नाकारले तरीही त्यांनी या निवडणूकीत बाजी मारत ते संचालक पदाची धुरा सांभाळत आहे. (Shirur News)
मतदार संघातील जनतेच्या सुखदुखासाठी फिरणारे निकम यांचे नेतृत्व दिसून येत आहे. त्यामुळे सण, उत्सव, यात्रा, उद्घाटन, दशक्रिया या सारख्या कार्यक्रमात त्यांची हजेरी पहावयास मिळते. त्यातून त्यांचा तरूणवर्ग व चाहता वर्ग वाढलेला पहावयास मिळतो. त्यामुळे या मतदार संघात बदलाचे वारे वाहू लागले असून देवदत्त निकम हे भावी आमदार असल्याचे कोल्हे यांनी सुचक विधान केले आहे. या सूचक विधानाने संपुर्ण बैलगाडा घाटातील ग्रामस्थ व बैलगाडा शौकीनांच्या भुवय्या उंचावल्या. (Shirur News)