अमिन मुलाणी
Shirur News : सविंदणे : पाळीव प्राण्यांवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत असून, बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येने शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात भितीचे वातावरण पसरले आहे. अशा ठिकाणी तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली आहे.
निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे सोमवारी (दि.१८) सुनील पांडुरंग घोडे हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील शेळीवर हल्ला केला. अचानक बिबट्याने हल्ला केल्यानंतर शेळीला शेजारच्या झुटपात ओढून नेले. (Shirur News) आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या शेतातून सहकारी शेतकरी धावून आले. बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत शेळीचा मृत्यू झाला होता.
पिंजरा लावण्याची होतीये मागणी
सध्या ऊसाच्या क्षेत्रातून बिबट दबा धरून पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या चारायला जाणाऱ्या मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण आहे. मागील काळापेक्षा आता बिबट्यांची संख्या वाढल्याने पाळीव प्राण्यांवर अधिक हल्ले होऊ लागले आहेत.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात माळवाडी, निमगाव दुडे, टाकळी हाजी, कवठे येमाई, मलठण, सविंदणे, म्हसे, जांबूत, पिंपरखेड या परिसरात दिवसाढवळ्या नागरिकांसह शेतमजुरांनाही बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतकऱ्यांसह महिला शेतमजूर बिबट्याच्या भीतीने धास्तावले आहेत. (Shirur News) यासाठी वनविभागाच्या माध्यमातून पिंजरा लावण्याचा तातडीने बंदोबस्त होण्याची गरज आहे.
लोकवस्तीवर हल्ले होण्याची शक्यता
परिसरातील कुत्रे, कोल्हे, ससे यांसारख्या प्राण्यांवर बिबट्याकडून मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांची संख्या कमी झाली आहे. लहान वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वनविभागाने परीसरात लहान लहान वन्य प्राण्यांची संख्या वाढवावी.
त्या बरोबर शिकार करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा. भक्ष मिळत नसल्याने बिबट सध्या मोठ्या प्रमाणावर पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे त्यांचा लोकवस्तीकडे मुक्त संचार वाढला आहे. (Shirur News) त्यातून मानवावर देखील हल्ले होण्याची शक्यता आहे. काही भागात प्रवाशांवर हल्ले होऊ लागले आहेत. त्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्तीचे प्रमाण वाढविले पाहिजे.
बिबट संख्येचे वाढले असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. बिबट बंदोबस्तासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे निकम यांनी यावेळी सांगितले.
…तात्काळ पिंजरा उपलब्ध करून देणार
याबाबत वन कर्मचारी हनुमंत कारकूड म्हणाले की, अन्न व पाण्याची उपलब्धता झाल्याने वास्तव करण्यासाठी आडोसा असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट प्रवण क्षेत्रात वारंवार सूचना व मार्गदर्शन केले जात आहे. (Shirur News) वनविभागाने दिलेल्या सूचना पाळल्या जाव्यात. त्याबरोबर संघटित होऊन शेतीकडे कामासाठी जाणे गरजेचे आहे.
बिबट प्रवण क्षेत्रात प्रवाशांनी रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबू नये. शेतकऱ्यांनी पशूधनाची संरक्षण कूंपन किंवा तारेची जाळी मारून बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण करावे. शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी लक्षात घेता घटनास्थळी तात्काळ पिंजरा उपलब्ध करून दिला जाईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : बाप्पांची विधीवत पूजा, आरती, धूप, उदबत्तीचा सुगंध अन् आकर्षक विद्युत रोषणाई…
Shirur News : पाबळ येथील जिजाबाई थिटे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Shirur News : शिरूर तालुक्यातील तलाठ्यांच्या गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गांभीर्याने दखल