Shirur News : शिरूर : हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या ( डिंभा धरण ) पाणलोट क्षेत्रामध्ये गुरूवार पहाटेपासून (ता. ७) सतत पाऊस पडत असल्याने हे धरण ९५.८७ टक्के भरले आहे. ९० टक्के पेक्षा अधिक धरण भरल्याने शुक्रवार (ता. ८) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास २८०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता दत्तात्रेय कोकणे यांनी दिली. त्या दरम्याने घोडनदी किनारी असणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
घोडनदी किनारी असणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी
निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी दु्ष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून खरीपाची पेरणी न झाल्याने शेतकरी वर्गात चितंचे वातावरण होते. मात्र धरण क्षेत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने डिभे धरण ९५.८७ टक्के भरले आहे. (Shirur News) या धरण क्षेत्रात आंबेगाव, शिरूर, जुन्नर तसेच नगर जिल्ह्यातील काहि गावांना पाणि पुरवठा होत असतो. हे धरण शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल करू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटू लागली आहे.
पावसाची सुरू असणारी संततधार यामुळे सध्या सर्वदूर पाऊसाच्या आगमनाने बळीराजा आनंद व्यक्त करू लागला आहे. खरीपाच्या बाजरीच्या पेरण्या ज्यांनी केल्या आहेत. (Shirur News) त्यांना या पावसामुळे बाजरी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या प्रमाणात बाजरीचे पिक नसल्याने हे पिक पक्षी येऊन देतील की नाही. याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या पावसामुळे ऊसा साठी जोरदार पाऊस मिळण्याची शक्यता असून ऊसाचे क्षेत्र वाढल्याने या पिकाला या पावसाचा आधार निर्माण झाला आहे.
दरम्यान, धरण क्षेत्र ९५.८७ टक्के भरले असल्याने डिंभा धरणाच्या तीन दरवाज्यांमधून २८०० क्युसेसने पाणी घोडनदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास डिंभे धरणातून केव्हांही जादा पाणी सोडण्यात येईल.(Shirur News) यासाठी नदीकाठच्या पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना कराव्यात. असे कोकणे यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कवठे येमाई गाव स्वयंस्फूर्तीने बंद
Shirur News : ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हणत परदेशी पाहुणे जपतात भारतीय संस्कृती