युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व द्या. सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवा. विकासकामे हाच तुमच्या प्रगतीचा आरसा आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांची ही शिकवण आहे. आपन सगळे एकत्रित राहून, समाजहित जोपासूया, असे आवाहन भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
वडनेर ते फाकटे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
वडनेर खुर्द (ता. शिरुर) येथे वडनेर ते फाकटे या रस्त्यांसाठी ४० लाख रुपये मंजुर झाले. या कामाचे भुमिपूजन माजी आमदार पोपटराव गावडे व भिमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Shirur News) या वेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, वडनेर सोसायटीचे अध्यक्ष बाबाजी निचित, सरपंच नवनाथ निचित, उपसरपंच विक्रम निचित, सुभाष निचित, गुरुनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नवनाथ राऊत, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, काठापुरचे सरपंच बिपीन थिटे, देखरेख संघाचे संचालक सपंतराव पानमंद, अध्यक्ष वसंतराव राळे, बाळासाहेब दरेकर, रामदास चव्हाण, नागेश केदारी, अध्यक्ष नवनाथ शेलार, रखमा निचित यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावडे म्हणाले की, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वडनेर ते फाकटे या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. टाकळी हाजी-वडनेर रस्त्याच्या उर्वरीत कामासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपये मंजूर झाले असल्याने, रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण होईल. वडनेर-सरदवाडी-मार्गे पिंपरखेड या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून गेल्या दीड महिन्यांपूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुकडी नदीवर वडनेर येथे तसेच घोडनदीवर पिंपरखेड-देवगाव दरम्यानचा पूल नाबार्डमधून प्रस्तावित असून, ही कामे लवकरच मंजूर होतील. (Shirur News) रस्त्याच्या कामासाठी तरुणांनी आंदोलन केल्यानंतर तातडीने सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी बैठक घेऊन या रस्त्याचे काम सुरू केले आहे.
भविष्यात पाण्यासाठी लढाई होईल
पाण्याची सध्यस्थितीतील मागणी व डिंभे धरणातील प्रस्तावित बोगदा यामुळे भविष्यात पाण्यावरून लढाई होईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. (Shirur News) पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून, धरणावर हक्क सांगणारे पाण्याची चोरी करू शकतात. घोडनदी, कुकडी नदीच्या पाण्यावर आपला हक्क अबाधित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी वेळेत भरावी. त्यासाठी नेहमी एकत्रित राहून, पाण्याचे रक्षण करावे असे आवाहन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : रस्त्यात खड्डे अन् खड्ड्यात पाणी; पिंपरखेड-देवगाव रस्त्याची दूरवस्था
Shirur News : ‘भिमाशंकर’चा अंतीम भाव ३१०० रुपये प्रतिटन