Shirur News : शिरूर : चार महिण्यांच्या पावसाळ्याच्या काळातील अडीच महिने संपत आले असले तरी तालुक्यात पिकांची अवस्था फार वाईट आहे. आता तर उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणे ऊन तापू लागल्याने जमिनीच्या वर आलेली पिेके माना टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. Shirur News
बळीराजा हवालदिल
जून महिण्याच्या मृग नक्षत्रात अजीबात पाऊस न झाल्याने तालुक्यात पेरण्याच झाल्या नाही. काही प्रमाणात रिमझीम पावसाच्या सरीने ओल निर्माण झाली. त्या जमीनीच्या ओली वर काही शेतकऱ्यांनी बाजरीच्या पेरणी केल्या. त्यावर पिके कोंबाच्या रूपात येऊन जमिनीच्या वर आली आहेत. सध्या ही पिके वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. Shirur News
ज्या शेतकऱ्यांच्याजवळ कुपनलीका, विहिरीच्या पाण्याची व्यवस्था होती त्यांनी पाणी देऊन पिकांना जगवले. परंतू या काळात दोन ते तीन फूटवाढ होणे गरजेचे होते. मात्र इतभर पिके वाढली आहेत. अशा अवस्थेत सध्या उन्हाळ्यासारखे वातावरण तयार होत असल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. या परिस्थितीने बळीराजा हवालदिल झाला असून पिकांना वाचवायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. Shirur News
शिरूर तालुक्यात सोयाबीन, बाजरी व कडधान्य या पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. या पिकांवर खरीप हंगाम अवलंबून असतो. मात्र कडधान्याची पेरणी झाली नाही. त्यामुळे कडधान्य या वर्षी पिकलेच नाही, अशी परिस्थीती आहे.
दरम्यान, सध्या थोड्याशा ओलीत पेरलेली बाजरी ला पाण्याची निंतात आवश्यकता आहे. जमिनीचे पाणी दिले तरच त्यांना केवळ वाचवता येते. पंरतू त्यांची पाहिजे तशी वाढ होत नाही. त्यामुळे पिके वाढली तरी उत्पन्नाच्या दृष्टिने फलदायी न ठरणारी आहे, असे बोलले जात आहे. Shirur News
या वर्षी पावसाने दडी मारली असून खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहित, त्यामुळे वर्षभर बाजरीच्या माध्यमातून तयार होणारी भाकरी देखील महागणार आहे. पावसाने दडी मारल्याने इतर पिकांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्याच्या हितासाठी दुष्काळ जाहिर करावा, त्यानुसार नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रूपये आर्थीक मदत देण्याची मागणी कवठे येमाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन हौशीराम मुखेकर यांनी केली आहे. Shirur News