भरत रोडे
Shirur News : कवठे येमाई : दैंनदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे. कमीत कमी कचरा निर्माण होईल. याची दक्षता घेऊन कचरा हा घंटागाडीतच टाकला पाहिजे. त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाही. असे मत जेष्ठ कार्यकर्ते मिट्टूशेठ बाफना यांनी व्यक्त केले. कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील ग्रामपंचायत सभागृहात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. (Shirur News) यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कवठे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
यावेळी कवठे गावचे उपसरपंच उत्तम जाधव, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, पांडुरंग भोर, किसन हिलाल, बाळशीराम मुंजाळ, सचिन बोऱ्हाडे, राजेंद्र इचके, नाना कांदळकर, प्रशांत सांगडे, सुखदेव देवकर, अजित शिंदे, अमोल पंचरास व आरोग्य केंद्राचे आशा सेवीका उपस्थित होते. (Shirur News) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश रत्नपारखी यांनी केले. तर बबन शिंदे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पारनेर ते टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती एसटी बस सेवा सुरू करा
Shirur News : Shirur News : टाकळी हाजीकरांकडून ग्राम स्वच्छता अभियान..