Shirur News : शिरूर : पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे स्विकारून, पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासकीय योजना, सेवा-सुविधांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष आबा सोनवणे यांनी केले.
बाभुळसर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
बाभुळसर (ता. शिरूर) येथे जिल्हा नियोजन समितीच्या ३० लाख रुपयांच्या निधीतून सरपंच वस्ती रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. (Shirur News) या वेळी नवनिर्वाचित भाजपचे जिल्हा सरचिटणीस भगवानराव शेळके, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू मचाले, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, समिती सदस्य राजू गदादे, सरपंच दीपाली नागवडे, उपसरपंच सुनील देशवंत, पंचायत समितीचे माजी सदस्य लक्ष्मण फराटे, संत तुकाराम सोसायटीचे अध्यक्ष सुनील नागवडे, महिंद्र नागवडे, माजी सरपंच शामराव नागवडे, मांडवगणचे उपसरपंच अशोक जगताप आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : टाकळी हाजीतील चार शिक्षकांना जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती पुरस्कार
Shirur News : आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी शिरूरला महिलांचे लक्षणिक उपोषण
Shirur News : पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने शाहिर विलास अटक यांचा सन्मान