योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : मोबाईलच्या दुनियेत विद्यार्थी ज्ञान आत्मसात करणे विसरत आहेत. गुगलच्या माध्यमातून हवी ती माहिती तत्काळ मिळत असल्याने विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा साठा राहिला नाही. ज्ञान आणि त्याचे उपयोजन करताना पुस्तक वाचन हे सर्वोत्तम साधन आहे. एक चांगले पुस्तक आपले जीवन बदलू शकते, असे मत भीमाशंकर शिक्षण संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी बी. डी. चव्हाण यांनी व्यक्त केले.
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॅा. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. (Shirur News) त्यावेळी ते बोलत होते. वाचन प्रेरणा संस्कृती, सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभाग या तीन विभागांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य मेजर प्रा. डॉ. शत्रुघ्न थोरात, राहुल डोळस, संदीप अवचिते, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. “विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे. कठोर परिश्रमाशिवाय यश प्राप्त करू शकत नाही. (Shirur News) आपल्या जीवनात पुस्तकांशी मैत्री करा, एकवेळ मित्र आपल्याला फसवतील; पण पुस्तके आपल्याला कधीच फसवणार नाहीत, असे मत प्राचार्य मेजर प्रा. डॉ. शत्रुघ्न थोरात यांनी व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : वडनेर खुर्दच्या पोलीस पाटीलपदी स्नेहल निचीत
Shirur News : शिक्षक व पालकांनी शितपेयांबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे : डॉ. संतोष उचाळे
Shirur News : मिडगुलवाडी ड्रग्जप्रकरणी जागा मालकावर गुन्हा दाखल