योगेश मारणे
Shirur News : न्हावरे, (पुणे) : रावसाहेबदादा पवार ‘घोडगंगा’ सहकारी साखर कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पाचे लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीचा बाजार भाव देणे शक्य होईल. असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी व्यक्त केला.
३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार ‘घोडगंगा’ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २९) कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. (Shirur News) यावेळी पवार बोलत होते.
यावेळी आमदार अशोक पवार, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, (Shirur News)जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, शशिकांत दसगुडे, रवींद्र काळे, राजेंद्र जगदाळे इत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने कारखान्याचे सभासद, कारखान्याचे आजी-माजी संचालक उपस्थित होते.
यापुढे बोलताना ऋषिराज पवार म्हणाले की, “कारखान्याच्या सभासदांनी संचालक मंडळावर टाकलेल्या विश्वासामुळे सर्व संचालक मंडळ कारखाना पुन्हा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने कारखान्याच्या भाग भांडवलामध्ये वाढ करण्यात येणार असून, नवीन सभासद संख्या वाढवण्यात येणार आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. यावेळी झालेल्या चर्चेत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब घाटगे, शिवसेनेचे सुधीर फराटे,काँग्रेसचे महेश ढमढेरे, सचिन शेलार, शरद गद्रे या सभासदांनी सहभाग घेतला व प्रश्न उपस्थित केले.सर्व उपस्थित प्रश्नांना कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी समर्पक उत्तरे दिली.
दरम्यान, यंदा घोडगंगा कारखान्याकडे सुमारे ८ हजार ७०० हेक्टर इतक्या उसाची नोंद झाली असून, ऊस उत्पादक सभासदांनी घोडगंगालाच ऊस घालावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी उपस्थित सभासदांना केले.
कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेताना ऋषिराज पवार यांनी कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची वीज खरेदी करताना त्यावेळेच्या राज्यसरकारने सुमारे २ रुपये प्रतीयुनिट कमी दराने वीज खरेदी केली. (Shirur News) त्यामुळे वीज खरेदी दरातही कारखान्यावर अन्याय केला गेला व कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. असे पवार यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : ‘घोडगंगा’च्या कामगारांचा संप तब्बल ९० दिवसांनंतर मागे
Shirur News : घनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी तिरसिंग जवळकर बिनविरोध
Shirur News : कवठे येमाई परिसरात मुसळधार पाऊस, ओढे-नाले लागले वाहू