शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत : शिरूर तालुक्यातील निमोणे येथे गेले काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. सुरक्षा व सुव्यवस्था राखता यावी यासाठी शिरूर येथील ॲड. सुमित देविदास पोटे यांनी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना निमोणे येथे पोलीस चौकी स्थापन करावी, असे निवेदन दिले.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसचौकीची गरज
निमोणे गावचे क्षेत्रफळ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसेल या दृष्टीने येथे पोलीस चौकी स्थापन करण्याची नितांत गरज आहे. (Shirur News) गावच्या हद्दीतील पोलीसचौकीची गरज, रात्री-अपरात्री कोऱ्या नंबर प्लेटच्या वाहनांचा वाढता वावर, स्थानिक नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करत आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत निमोणे येथे पोलीस चौकी स्थापन करण्याची आवश्यकता आहे. ॲड. पोटे यांनी शिरूर शहराचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांना याबाबत निवेदन दिले आहे.
या वेळी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून, आपल्या पोलीस चौकीच्या मागणीला प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले. (Shirur News) या संदर्भात शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पोपटराव शेलार यांनी पत्र दिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापन आवश्यक : प्रकाश वायसे
Shirur News : शिरुर तालुक्यातील जांबूत येथील श्रीराम गोरडे यांची कर सहाय्यक पदी निवड..