अमिन मुलाणी
Shirur News : शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या आवारात २००३ पासून म्हणजेच गेली २० वर्षांपासून जप्त, बिनधनी व अपघातग्रस्त वाहने मालकांच्या प्रतीक्षेत धुळ खात पडून होती. वाहनांची न्यायालयीन प्रक्रिया संबंधित वाहन मालकांनी पूर्ण न केल्याने तसेच बेवारस वाहनांचे मालक आढळून येत नसल्याने, ही वाहने मालकांच्या प्रतीक्षेत होती. आता वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे पुढील कारवाईला वेग आला आहे.
न सोडविलेल्या वाहनांचा होणार लिलाव
दरम्यान, पोलीस स्टेशनच्या आवारात वाहनांची गर्दी झाल्यामुळे काम करणे जिकरीचे झाले होते. वाहने अनेक वर्षांपासून शिरूर पोलीस ठाणे परिसरात पडून असल्याने, त्याची विल्हेवाट लावण्याबाबतचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी आदेश दिले होते. (Shirur News) वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गंगा माता वाहन शोध संस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेत, शिरूर पोलीस ठाणे आवारात असलेल्या एकूण चारशेहून अधिक जप्त, बिनधनी व अपघातग्रस्त वाहनांपैकी एकूण २२० वाहनांचे चॅसी नंबर व इंजिन नंबर यांच्या मदतीने मालकाचे नाव व पत्ता काढण्यात आला. वाहनमालकांना वाहन ताब्यात घेण्यासाठी ८ दिवसांच्या आत येण्याचे कळविण्यात येणार आहे.
वाहनमालक वाहन सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर न राहिल्यास, त्यांना वाहनामध्ये स्वारस्य नाही असे समजून वाहनाचा लिलाव करण्यात येणार आहे. (Shirur News) येणारी रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी कळविले आहे. शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातील जप्त, बिनधनी व अपघातग्रस्त वाहने मालकांच्या ताब्यात देण्याचे काम आता सोपे होणार आहे. वाहनधारकांना त्यांचे वाहन परत मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
संबंधित कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस हवालदार परशुराम सांगळे, पोलीस नायक बापू मांडगे, राजेंद्र वाघमोडे, बाळू भवर, अर्चना यादव, शेखर झाडबुके, वीरेंद्र सुबे व गंगा माता वाहन शोध संस्था, परंदवाडी, ता. मावळ, जि. पुणे यांचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, संजय काळे व भारत वाघ यांनी परिश्रम घेतले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : चासकमानचे पाणी पेटले; ऐन पावसाळ्यात शेतकरी रस्त्यावर!
Shirur News : डिंभा धरण ९१ टक्के भरले; उजव्या कालव्याला १५० क्युसेसने सोडले पाणी
Shirur News : शेरखान शेख… पशु-पक्ष्यांची भाषा जाणणारा शिरूरचा अवलिया!