शिरूर: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी चालवली आहे. उमेदवारांची देखील चर्चा सुरु आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एका नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्याच उमेदवाराला शिरूर-हवेलीसाठी उमेदवारी देण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव सर्वांनी एकमताने केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत अन्य पक्षातील इच्छुक उमेदवार आयात करू नये, असे पत्र देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक शांताराम बापू कटके, माजी संचालक बाबासाहेब फराटे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी बापू काळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र कोरेकर, महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चंदन सोंडेकर, कोलवडी सरपंच विनायक गायकवाड, दिलीप गाडेकर, रोहिदास टिळेकर, प्रसाद कांचन, सुनील कांचन, गणेश झुरुंगे, हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा चारुशीला कांचन, हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष उत्कर्षा गोते, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष ज्योती थोरात, रंजिता गाढवे, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुशाल नाना सातव-पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष जयेश कंद, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष युवराज काळभोर सागर खंडागळे उपस्थित होते.
तसेच जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष गुरमीत सिंग गिल, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय वीर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष किरण बापू वाळके, हवेली तालुका राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष तात्यासाहेब वाळके, हवेली तालुका सहकार आघाडीचे अध्यक्ष अमर आबा गायकवाड, पुणे जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष प्रवीण आव्हाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष करण थोरात, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पंडित कोलते, विक्रम वाघमारे, सुजित दळवी, स्वप्निल काळभोर, सहदेव शिवले, सिद्धेश्वर काळभोर, रमेश काळभोर आणि शिरूर हवेलीमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.