अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या (Shirur Crime) अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत मॅफेड्रोन (एम.डी.) विक्रीसाठी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणास अटक केली आहे. आरोपीकडून 2.8 ग्रॅम मॅफेड्रोन आणि स्कुटीसह एकूण 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पवन सागर भंडारे (वय 19, रा. वाडा कॉलनी, शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे शिरूर परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांनी शिरूर नगर परिषदेपुढे सापळा रचला. या दरम्यान, अॅक्टीव्हा स्कुटी (क्र. एमएच 12 एमटी 6839) वरून संशयित व्यक्ती येताना आढळून आली. पोलिसांनी सापळा लावून त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

पंचासमक्ष घेण्यात आलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडून प्लास्टिकच्या पुडीत 2 ग्रॅम 80 मिली पांढऱ्या रंगाचा मॅफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याचबरोबर वापरलेली स्कुटीही जप्त करण्यात आली असून, संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत 72 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने पवन भंडारे यास 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, डी.बी. पथकाचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, पवन तायडे, भाऊसाहेब ठोसरे, अजय पाटील यांनी केली.
या कारवाईचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे करीत आहेत.
हेही वाचा: Ayush Komkar Murder: पुणे गँगवॉरवर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य; “कोणीही डोकं वर काढलं, तर..







